ताज्याघडामोडी

कुस्ती रंगली, पैलवानानं डाव टाकला; प्रतिस्पर्धी उठलाच नाही, कुटुंबाला वेगळाच संशय

वसंत पंचमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत एका पैलवानाचा मृत्यू झाला. लखीसराय जिल्ह्यातील हुसैना गावात सरस्वती पुजनाच्या दिवशी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात राज्यभरातील कुस्तीपटूंनी सहभागी घेतला होता. या स्पर्धेत मोकामाहून सहभागी होण्यासाठी आलेल्या त्रिपुरारी कुमारचा मृत्यू झाला. प्रतिस्पर्धी पैलवानानं त्रिपुरारीला चितपट केलं. त्यानंतर जमिनीवर पडलेला त्रिपुरारी उठलाच नाही.

लखीसराय जिल्ह्यातील हुसैना गावात गुरुवारी संध्याकाळी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान एका पैलवानाचा मृत्यू झाला. त्रिपुरारी कुमार असं त्याचं नाव असून तो पाटण्याच्या मोकामाचा रहिवासी आहे. आयोजन समितीनं या घटनेसंदर्भात माहिती देण्यास नकार दिला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर याची माहिती मृत पैलवानाच्या कुटुंबाला देण्यात आली.

वसंत पंचमीनिमित्त लखिसरायमध्ये दरवर्षी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. गुरुवारी संध्याकाळी त्रिपुरारीचा मुकाबला पवन कुमारशी होता. पवननं त्रिपुरारीला चितपट करण्यासाठी डाव टाकला. त्रिपुरारी जमिनीवर पडला. काही वेळ झाला तरीही तो उठला नाही. त्रिपुरारीचा मृत्यू झाल्याचं प्रेक्षकांच्या लक्षात आलं. त्यानंतर एकच खळबळ माजली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्पर्धास्थळी पोहोचले. त्यांनी त्रिपुरारीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *