ताज्याघडामोडी

शरद पवारांनी टीका केली आणि हा नेता चर्चेत आला

अहमदनगर: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्याने नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड सध्या ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या निशाण्यावर आहेत. निवडणुकीत पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या पिचडांची भाजपकडूनही नंतर उपेक्षाच झाली. आता मात्र भाजपने पिचडांना शक्ती देण्याचे ठरविले असून माजी आमदार वैभव पिचड यांची भाजपच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय मंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *