ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातल्या पाच बँकांना धक्का, आरबीआयची मोठी कारवाई

भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने महाराष्ट्रातल्या पाच बँकांवर कारवाई केली आहे. इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव बँक, जनकल्याण सहकारी बँक, द पाटण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक आणि पुणे नगर निगम सर्व्हंट्स को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक या पाच बँकांना आरबीआयने दंड ठोठावला आहे.

शहरी सहकारी बँकांसाठी गुंतवणूक, मेनटेनन्ससाठी आरबीआयने दिलेल्या नियमांचं पालन न केल्याप्रकरणी इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, पुणेला 5 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय जन कल्याण सहकारी बँक, मुंबईला 5 लाखांचा, पाटण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, साताराला 2 लाखांचा दंड लावण्यात आला.

पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकवरही 1 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पुणे मर्चंट्स बँकेने निष्क्रीय खात्यांची वार्षिक समीक्षा केली नाही, म्हणून आरबीआयने ही कारवाई केली. याशिवाय पुणे नगर निगम सर्व्हंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवरही 1 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. या बँकेनेही निष्क्रीय खात्यांची वार्षिक समिक्षा केली नाही, असं आरबीआयने सांगितलं. आरबीआयने या बँकांवर कारवाई केली असली तरी या बँकांमधला ठेवीदारांचा पैसा सुरक्षित आहे, तसंच ग्राहकांच्या रोजच्या व्यवहारांवर या कारवाईचा कोणताही परिणाम होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *