ताज्याघडामोडी

स्वेरी मध्ये दि. १५ व दि १६ सप्टेंबर रोजी ‘ऑलम्पस २ के २२’ या तांत्रिक स्पर्धेचे आयोजन

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात येत्या दि. १५ व दि १६ सप्टेंबर रोजी ऑलम्पस २ के २२’ या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाच्या पोस्टरचे नुकतेच उदघाटन करण्यात आले.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.

        ‘शिक्षक दिनाचे औचित्य साधून ऑलम्पस २ के २२’ या  उपक्रमाच्या पोस्टरचे उदघाटन शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  जेष्ठ विचारवंत व व्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर (माऊली) जाधवशिवणे उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.विजयकुमार वाघमोडेअण्णासाहेब पाटील उच्च महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आबासाहेब सलगर यांच्या हस्ते तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक कालिदास साळुंखेस्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे,  स्वेरीचे अध्यक्ष नामदेव कागदेजेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगेविश्वस्त एच.एम.बागलयुवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ऑलम्पस २ के २२’ च्या राष्ट्रीय स्तरावरील तंत्रस्पर्धेत ड्रॉ कॅडकटिया थॉनटेक्नो मेक क्विझब्रीज मेकिंगकॅड रेससिव्हील टेक्नो क्विझसर्वे हंटइलेक्ट्रो एक्सटेम्पोरई-क्विझइलेक्ट्रिकल मास्टरमिरर कोडटेक एनिमेशनकॉम पोस्टराईज,एनएफएससर्किट सुडोकोप्रोग्राम मनियावीन टू बझपेपर प्रेझेन्टेशनअॅग्रो चॅलेंज- प्रोजेक्ट कॉम्पिटीशनफन झोन असे एकूण २१ तांत्रिक इव्हेंटस् असून यासाठी विजेत्यांना  जवळपास एक लाखांपर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत अभियांत्रिकी तसेच पदविका अभियांत्रिकीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपतीसमन्वयक प्रा. डी.टी. काशीद यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या वतीने ऑलम्पस २ के २२ चे विद्यार्थी अध्यक्ष प्रमोद आवळेकरविद्यार्थी सचिव दीपक शिंदेउपाध्यक्षा राजनंदिनी पवारसहसचिव आयेशा मुजावरखजिनदार जान्हवी देवडीकरसहखजिनदार श्रेयस कुलकर्णीप्रा. सचिन काळेप्रा.नितिन मोरेप्रा.सहदेव शिंदेप्रा.विजय सावंतसर्व अधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापकवर्ग व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. ऑलंम्पस २ के २२’ च्या निमित्ताने अभियांत्रिकीच्या सर्व विभागात जय्यत तयारी केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. ऑलम्पस २ के २२’ या स्पर्धात्मक कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी समन्वयक प्रा. दिगंबर काशीद (८२०८७२४२६६) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *