गुन्हे विश्व

अवैध वाळू उपशावर पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई 

         गेल्या काही दिवसापासून पंढरपूर शहर तालुक्यातील भीमा नदीकाठावरून होणार अवैध वाळू उपसा रोखण्यात पोलिसांना बऱ्यापैकी यश आलेले असताना रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करण्याचा प्रयत्न पोलिसांनी कारवाई करीत हाणून पडल्याचे दिसून येत आहे.गेल्या आठवड्यात सरकोली येथे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यानी कारवाई केली होती तर गुरुवार दिनांक २८ रोजी पंढरपूर शहर पोलिसांनी जुना अकलूज रस्ता येथील कंडरे तालिमी नजीक अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या महिंद्रा पिकअप वर कारवाई केली असून या कारवाईत पिकअप चालकास शहर पोलिसांनी वाहनासह ताब्यात घेतले असून या कारवाईत एक पिकअप मधील एक इसम पसार होण्यात यशस्वी ठरला आहे.
         या बाबत पंढरपूर शहर गुन्हेप्रकटीकरण शाखेत कार्यरत असलेले पो.कॉ.सुजित जाधव यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार शहर हद्दीत अवैध व्यवसाय आढळून आल्यास कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक यांनी दिल्याने फिर्यादीसह पो.स. ई. गाडेकर, पो.हे.काँ. हेंबाडे, पो.हे.काँ. कदम, पो.ना.पवार,पो.ना. पठाण,पोकाँ/27 मोरे, पोकाँ/484 बनसोडे, पो.काँ.माने हे पेट्रोलिंग करीत असताना रात्री सात वाजलेच्या आसपास  जुना अकलूज रस्ता येथील कंडरे तालिमी नजीकच्या रस्त्यावर एक इसम पिकअप घेवुन कंडरे तालमी कडुन जुन्या अकलुज रोड कडे येत असताना दिसला. सदर वाहनातून अवैध वाळू उपसा होत असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी या वाहनाच्या दिशेने गेले असता पिकअप मध्ये चालकाच्या शेजारी बसलेला इसम दरवाजा उघडुन पळुन गेला तर पोलिसांनी चालकास जागीच पकडले त्याची विचारपूस केली असता त्याने आपले नाव समाधान रामचंद्र साळुंखे वय-38 रा. गादेगाव ता.पंढरपुर सांगितले.
       या कारवाईत महिन्द्रा कंपनीची बोलेरो पिकअप( एम.एच. 13 सी.जे 0359 ) व पाउन ब्रास वाळू असा 4,54,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *