उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात बारामती भेटीत चर्चा बंद खोलीत चर्चा झाल्याने चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार शिवेंद्रराजे यांची जवळीक लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच शिवेंद्रराजे भोसले यांनी पवार यांच्या सातारा दौऱ्यावेळी त्यांची भेट घेतली होती. ते आता थेट बारामतीला भेटीसाठी आले होते. या दोघांच्यात बंद खोलीत झालेल्या चर्चेचा तपशील मिळाला नाही. सदर चर्चेनंतर शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील विकासकामासंबंधी चर्चेसाठी पवार यांच्या भेटीला आल्याचे सांगितले. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले.
