Uncategorized

विठ्ठल कारखान्याच्या यार्डजवळील आत्महत्या मुकादमाच्या जाचामुळे

कर्नाटकात झालेल्या मारहाणीनंतर मयत होता प्रचंड तणावात

सुभाष शिवाजी जाधव रा.रा.येवता ता. केज जि.बीड हा ऊसतोड कामगार कादम बालू चिंचकर यांच्या टोळी मध्ये काम करीत होता व शिवशक्ती साखर कारखाना बागेवाडी ,कर्नाटक येथे उस तोडीकरता गेलेला होता.त्या ठिकाणी वाद झाल्यानंतर मुकादम बालू चिंचकर व त्याचा भाऊ गोविंद चिंचकर यांनी सुभाष याला हात पाय बांधून गंभिररीत्या मारहाण केली होती असे मयत सुभाष याने भाऊ व सदर प्रकरणातील फिर्यादी संतोष शिवाजी जाधव वय 27 वर्षे जात मातंग व्यवसाय -उसतोड कामगार रा.येवता ता. केज जि.बीड यास सांगितले होते.या घटनेनंतर मयत सांदीप जाधव हा प्रचंड तणावाखाली होता.या तणावातूनच त्याने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे येथे यार्ड जवळ अज्ञात वाहनाखाली उडी मारून आत्महत्या केली आहे अशा आशयाची फिर्याद संतोष शिवाजी जाधव वय 27 वर्षे जात मातंग व्यवसाय -उसतोड कामगार रा.येवता ता. केज जि.बीड सध्या 45 गाव फाटा टाकळी यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
          या बाबत दाखल फिर्यादीनुसार फिर्यादीचा मोठा भाऊ सुभाष हा मुकादम बालू चिंचकर याचे बरोबर कर्नाटक येथे सहकारी साखर कारखान्यावर उस तोडीकरता गेलेला होता. त्याठिकाणी सुभाष याचे बालू चिंचकर याचेबरोबर वाद झालेबाबत एक महिन्यापूर्वी सुभाषणे फिर्यादीस कळविले होते. त्यावेळी बालू चिंचकर व त्याचा भाऊ गोविंद चिंचकर यांनी सुभाष याला हात पाय बांधून गंभिररीत्या मारहाण केली होती असे त्याने सांगितले होते. म्हणून फिर्यादी व काम करत असलेल्या टोळीतील काम करणारा ड्रायव्हर काटे याचेसह कर्नाटक येथे भाऊ सुभाष काम करत असलेल्या कारखान्यावर जावून आले परंतू त्याठिकाणी भाऊ तसेच बालू चिंचकर तेथे भेटले नाहित.त्यानंतर घरी आल्यानंतर टोळीतील एका व्यक्तीला फोन करून बालू चिंचकर याचेशी बोल्लो त्यावेळी माझ्यात व त्याच्या वादविवाद झाला. या वादविवादा नंतर सुभाष हा त्याला घाबरून तेथून निघून म्हमंदापूर येथिल मठामध्ये राहण्यास गेला. त्याठिकाणी बालू चिंचकर याने जावून पून्हा त्यास दमदाटी केली होती.त्यामुळे भाऊ सुभाष हा बालू चिंचकर हा आपले काहीतरी बरी वाईट करील या भितीने त्या तणावा खाली राहत होता.काल दि. 22/01/2021 रोजी सकाळी 08.00 वा. चे सुमारास फिर्यादीस मोबाईल नंबर 8390397158. वर कोणीतरी फोन करून सांगितले कि , तुझा भाऊ विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या यार्डाजवळ गुरसाळे येथे मयत झाला आहे. यावरून भाऊ सुभाष शिवाजी जाधव वय. 35 वर्ष याने बालू चिंचकर याचे भितीपोटी कोणत्यातरी अज्ञात वाहनाखाली उडी मारल्याने व त्याच्या अंगावरून वाहनाचे चाक गेलेने तो मयत झाला आहे. त्यास सदरचे कृत्य करण्यास बालू चिंचकर व गोविंद चिंचकर यांनीच प्रवृत्त केले अशा आशयाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *