

काही लोकांचे वाढीव बिल कमी करण्यासाठी माजी आमदार राजू तोडसाम आपल्या समर्थकांसह वीज वितरण कार्यालयात गेले होते, तेथील लेखापाल विलास आकोट यांच्याशी त्यांचा वाद होऊन आकोट यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार आकोट यांनी दाखल केली होती. या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी भादंवि 294, 352, 353, 506 नुसार गुन्हा दाखल केला होता.कानिष्ठ न्यायालयाने 2015 साली माजी आमदार राजू तोडसाम यांना सुनावलेली 3 महिने कारावासाची शिक्षा आज जिल्हा सत्र न्यायालय पांढरकवडाने कायम केल्याने राजू तोडसाम यांची यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली.
नागपूर उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात धाव घेणार : राजू तोडसाम
यावेळी शासनातर्फे सरकारी वकील आर. डी. मोरे यांनी तर राजू तोडसाम यांच्यातर्फे ऍड. गणेश धात्रक यांनी काम पाहिले, तर संतोष राऊत हे पैरवी अधिकारी म्हणून उपस्थित होते. उद्या आपण नागपूर उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात धाव घेणार असल्याचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी सांगितले. सदर शिक्षेमुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.