ताज्याघडामोडी

प्रताप सरनाईकांची 100 कोटींची 78 एकर जमीन ईडीकडून जप्त किरीट सोमय्यांचा दावा

   कल्याण : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची टिटवाळा गुरुवली येथील 100 कोटींची 78 एकर जमीन ईडीने जप्त केली असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. टिटवाळा गुरुवली येथील जमिनीच्या ठिकाणी किरीट सोमय्या यांनी आज प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी घोटाळा केलेली 100 कोटींची रक्कम परत न केल्यास सरनाईक यांच्या अन्य मालमत्ताही ईडी जप्त करण्याची कारवाई करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

    यावेळी सोमय्या यांनी सांगितलं की, एनईसीएलच्या 100 कोटींच्या घोटाळ्याच्या रकमेतून सरनाईक यांनी टिटवाळा गुरुवली येथे 78 एकर जमीन विकत घेतली होती. ही जमीन ईडीने जप्त करण्याची नोटीस 2014 सालीच काढली होती. आता ही जमीन जप्त करण्याची कारवाई ईडीने केली आहे. उद्धव ठाकरे यांचा राईट हॅण्ड असलेल्या घोटाळेबाज सरनाईकांच्या विरोधात ठाकरे सरकार काय कारवाई करणार आहे? असा सवाल सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला. 13 हजार गुतंवणूकदारांचे 560 कोटी रुपये सरनाईक यांनी गायब केले आहेत. घोटाळ्याषी सरनाईक यांचा थेट संबंध आहे. 100 कोटी रुपये सरनाईक यांनी परत न केल्यास ईडी सरनाईकांच्या अन्य मालमत्ताही जप्त करण्याची कारवाई करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *