ताज्याघडामोडी

कर्मयोगी पॉलिटेक्निकचा प्लेसमेंटमध्ये पश्चिम महाराष्ट्रात डंका

          शेळवे :शेळवे येथील श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित, कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजच्या ३३ विधार्थांची बजाज ऑटो पुणे या आंतराष्ट्रीय कंपनीत निवड झाली. कर्मयोगी पॉलिटेक्निकच्या अंतिमवर्षातील ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली-कम्युनिकेशन व मेकॅनिकल विभागातील विध्यार्थांचा या निवडीत समावेश आहे. दरम्यान चालू शै. वर्ष २०२०-२१ वर्षात लॉकडाउन असून सुद्धा ३३ विध्यार्थांची बजाज ऑटो पुणे या कंपनीत निवड झाली आहे, ही बाब खूपच गौरवास्पद आहे.
          कर्मयोगी पॉलिटेक्निकमध्ये कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यास नेहमी प्राधान्य दिले जाते, त्यामुळे ग्रामीण भागातील विध्यार्थांना करियरच्या सुरुवातीची नोकरी मिळाल्याचा आनंद होऊन आत्मविश्वास वाढण्यास मदत होते अशी माहिती कॉलजचे प्राचार्य डॉ. ए.बी.कणसे यांनी सांगितले.मागील शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजच्या अंतिम वर्षातील १५० हुन अधिक विध्यार्थांची जॉनडियर, केएसपीजी ऑटोमोटिव्ह ,सिग्मा इलेक्ट्रिक, बजाज ऑटो, फिलिप्स, फ्लेक्स, सुझलर, टाटामोटर्स, रिजन पॉवरटेक यासारख्या आंतराष्ट्रीय कंपनीत निवड झाली.
          कर्मयोगीतील विध्यार्थ्यांच्या चांगल्या परफॉर्मन्समुळे विविध कंपनीमध्ये काम कारणाऱ्या बऱ्याच विध्यार्थाना “बेस्टएम्प्लॉईअवॉर्ड” मिळालेले आहेत, यामुळे पश्चिममहाराष्ट्रामध्ये कर्मयोगीस प्रथम प्राधान्य देयून विध्यार्थांची ऑनलाईन ऍप्टिट्यूड टेस्ट व एचआर इंटरव्हिवद्वारे ३३विध्यार्थांची निवड झाली. कॉलेज मध्ये विध्यार्थांच्या सर्वांगीण विकासाकरिता दिले जाणारे लक्ष, शिस्त, दत्तक पालकयोजना आणि प्लेसमेंटसाठी ऍप्टिट्यूड व इंटरव्हिवची खास तयारी करून घेतली जाते. कंपनीमध्ये लागणारी शिस्त कर्मयोगी कॉलेजमध्येच विध्यार्थी आत्मसात करतो. त्यामुळे कॉलेज जिल्हयामध्ये कौतूकास पात्र ठरले आहे. कॉलेजमध्ये असणाऱ्या सुसज्य व आधुनिक प्रयोगशाळेमुळे विध्यार्थी प्रॅक्टिकल ज्ञानामध्ये कुशल होतो.
          निवड झालेल्या यशस्वी विध्यार्थांचे अभिनंदन संस्थेचे प्रमुख मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक, विश्वस्त मा. रोहन परिचारक तसेच कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ.ए. बी. कणसे ,कर्मयोगी इंजिनीरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस.पी.पाटील, कॉलेजचे रजिस्ट्रार श्री जी.डी.वाळके, ट्रैनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर श्री शेख एम.एन.,श्री. शिंदे एस.पी., सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विध्यार्थांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *