ताज्याघडामोडी

कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये “ऑप्शन फॉर्म” भरण्याची सुविधा उपलब्ध”

कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये “ऑप्शन फॉर्म” भरण्याची सुविधा उपलब्ध

श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपुर संचलित, कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज शेळवे, पंढरपूर येथे प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिये करीता विद्यार्थ्यांना “ऑप्शन फॉर्म” भरण्याची सुविधा महाविद्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे.
कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज शेळवे, पंढरपूर हे लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाशी संलग्न असल्याने या महाविद्यालयात प्रवेश घेऊन यशस्वीरित्या शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना DBATU विद्यापीठाची B.Tech डिग्री प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत अनुक्रमे दिनांक 7, 8 व 9 जानेवारी 2021 पर्यंत देण्यात आली आहे. तरी प्रवेशास पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन ऑप्शन फॉर्म वेळेमध्ये भरावेत, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आवाहन कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी केले आहे.
महाविद्यालयात प्रत्यक्ष येणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोविड-19 नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी प्रत्यक्ष येऊ शकत नाहीत त्यांना फोन वरून मार्गदर्शन मिळू शकते. संपुर्ण माहितीसाठी संपर्क क्र. प्रा.देशमाने ए.ए.-9552235854 व प्रा.सावेकर एस.जे.-9860035138 वर संपर्क साधावा.
तसेच कोविड-१९च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना “सुधाकरपंत परिचारक विद्यार्थी कल्याण योजनेमार्फत” फी सवलत जाहीर केली आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी फॉर्म भरणे पूर्वी महाविद्यालयात नाव नोंदणी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *