ताज्याघडामोडी

लॉकडाऊनचा फटका सहन केलेल्या हॉटेल,दुकान कामगारांना ४५ दिवसांचा पगार शासन देणार 

लॉकडाऊनचा फटका सहन केलेल्या हॉटेल,दुकान कामगारांना ४५ दिवसांचा पगार शासन देणार 

केंद्र सरकाराच्या अटल कल्याण योजनेअंर्तगत अर्ज करण्याचे आवाहन 

नोंदणीच नसल्याने पंढरपुरातील शकडो कामगार राहणार लाभापासून वंचित

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात २४ मार्च पासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.या काळात हॉटेल,दुकाने,ट्रान्सपोर्ट,थिएटर,मॉल आदी ठिकाणी कामगार म्हणून काम करणाऱ्या अनेकांना फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला असून अनेकांनी रोजगार गमावले आहेत.तर लॉकडाऊनच्या काळात अनेकांना तात्पुरत्या स्वरूपात कामावरून कमी करण्यात आल्यामुळे खूप हाल सोसावे लागले आहेत.मात्र आता या कामगारांना मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.शासनाच्या अटल बिमीत व्यक्ती कल्याण योजनेतून या कामगारांना ९० दिवसाच्या रोजगारांपैकी ४५ दिवसाच्या रोजगाराच्या रकमेची भरपाई करण्यात येणार आहे.   
    १० पेक्षा अधिक कामगार असलेले व कामगार कल्याण मंडळ व कामगार विमा योजनेकडे नोंदणीकृत असलेल्या कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.मात्र खाजगी आस्थापनांमध्ये असलेल्या कामगारांची नोंदणी करण्याची जबाबदारी असलेल्या कामगार विभाग व कामगार कल्याण मंडळ यांच्याकडून कामगारांच्या  पुरेसा पाठपुरावा होत नसल्याने तसेच विविध बहुतांश व्यवसायिक आपल्याकडील कामगारांचे रेकॉर्ड ठेवण्याबाबत व नोंदणी करण्याबाबत फारसे इच्छुक नसतात त्याचा फटका मात्र सामान्य कामगारांना सहन करावा लागणार आहे.        
             पंढरी वार्ताच्या माध्यमातून आम्ही कामगार नोंदणी बाबत सातत्याने पाठपुरावा करीत आलो असून गत महिन्यात राज्य कामगार विमा योजनेचा मोफत लाभ घेण्याबाबत या विभागाकडून करण्यात आलेल्या आवाहनाबाबतही सविस्तर वृत्त प्रकशित केले होते.पंढरपूर शहर व तालुक्यातील हॉटेल्स,रेस्टोरंटस,दुकाने या ठिकाणी कार्यरत असलेल्या कामगाराची नोंदणीच नगण्य असल्याने केंद्र सरकार कडून ४५ दिवसांच्या मिळणाऱ्या पगाराच्या लाभापासून अनेकजण मुकणार आहेत. 
                       

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *