ताज्याघडामोडी

पञकार संतोष रणदिवे यांना ‘समता गौरव’ पुरस्कार

पञकार संतोष रणदिवे यांना ‘समता गौरव’ पुरस्कार

पंढरपूर – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त समता दिनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, शाखा – फुलचिंचोली यांच्यावतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दै. तरुण भारत संवादचे पञकार संतोष रणदिवे यांना अन्न व नागरी पुरवठा मंञी छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते ‘समता गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
  समता भूमी,महात्मा फुले स्मारक पुणे येथे ‘समता पुरस्काराचे’ वितरण करण्यात आले. पञकार संतोष रणदिवे यांनी तीन वर्षांपासून पंढरपूर शहर व तालुक्यातील कृषी, सामाजिक, शिक्षण, उद्योग, राजकारण आदी क्षेञातील बातम्या देण्याचे काम केले आहे. कोरोना महामारी कालावधीत लोकजागृती, माहिती देण्याचे काम केले आहे. यावेळी कैलाश करांडे (शैक्षणिक), चतूर भाावड्या उर्फ बाळासाहेब पाटील (कला पुरस्कार), सद्दाम मणेरी (सामाजिक), भैरवनाथ बुरांडे (कृषी), चंद्रकांत भुजबळ (साहित्य) यांना समता गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
   यावेळी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, माजी खासदार समीर भुजबळ, आ. पंकज भुजबळ, प्रदेश सरचिटणीस प्रा. हरी नरके, बापूसाहेब भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी घाडगे, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे, डाॅ. कैलास कमोद, जी. जी. चव्हाण, प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, सोलापूर जिल्हा पुरस्कार समितीचे पंढरपूर तालुका अध्यक्ष चंद्रशेखर जाधव, मोहोळ ता.अध्यक्ष अमोल माळी, कार्याध्यक्ष बापू वसेकर, उत्तर सोलापूर ता.अध्यक्ष बालाजी माळी, दत्ताञय जाधव, सचिन देवमारे, सावता जाधव, विश्वास वसेकर, लक्ष्मण माळी यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातून समता सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *