ताज्याघडामोडी

पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ.निळकंठ खंदारे यांना बहुजन पुरोगामी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा पाठींबा 

पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ.निळकंठ खंदारे यांना बहुजन पुरोगामी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा पाठींबा 

सुटा संघटनेनेही प्रथम पसंतीचे उमेदवार म्हणून कालच दिला होता पाठींबा 

पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून या मतदार संघातील उमेदवार डॉ.निळकंठ खंदारे हे मतदारांच्या गाठीभेटी घेऊन व प्रचार बैठकांच्या माध्यमातून आपली भूमिका समजावून सांगत आहेत.डॉ.नीलकंठ खंदारे यांना कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी विद्यापीठ व सोलापूर येथील अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठा अंतर्गत सुटा संघटनेने प्रथम पसंतीचे उमेदवार म्हणून नुकताच आपला पाठींबा जाहीर केला होता.त्यानंतर आता बहुजन पुरोगामी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने देखील डॉ.नीलकंठ खंदारे यांना आपला पाठींबा जाहीर केल्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.   

     बहुजन पुरोगामी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने काढलेल्या पाठींबा दर्शक पत्रकानुसार पुणे विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक दिनांक .१/१२/२०२० पार पडत आहे.बहुजन पुरोगामी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने जाहिर पाठिंब्यासाठी खालील उमेदवारांशी सखोल वप्रदीर्घ चर्चा केली.त्या उमेदवारांची सामाजिक, शैक्षणिक, क्षेञातील कार्य,विविध प्रश्नांची असलेली जाण, त्यांची सोडवणूक करण्याची मनामध्ये असलेली चाड, त्यासाठी दिलेला लढा,संघर्ष, छञपती शिवाजी महाराज- महात्मा फुले- राजर्षी शाहू- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  इत्यादी महामानवांच्या विचारांशी असलेली बांधिलकी या सर्व बाबींचा विचार करता त्यांना संघटनेचा पाठिंबा जाहीर केला आहे.     तरी बहुजन पुरोगामी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सभासद, फुले- शाहू – आंबेडकर- अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेचे अनुयायी, कार्यकर्ते,नेते, समाजसेवक इत्यादींनी पसंती क्रमांक १ चे मत डॉ.नीलकंठ खंदारे याना   देवून  प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन प्रा.डाॅ.राजकुमार सोनवले ( अध्यक्ष- बहुजन पुरोगामी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, सोलापूर) यांनी केले आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *