ताज्याघडामोडी

वाट चुकलेल्या वृद्धेस केले कुटूंबाच्या स्वाधीन नगरसेवक डी. राज सर्वगोड व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी मागाडे कुटूंबाची दिवाळी केली गोड 

वाट चुकलेल्या वृद्धेस केले कुटूंबाच्या स्वाधीन

नगरसेवक डी. राज सर्वगोड व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी मागाडे कुटूंबाची दिवाळी केली गोड 

सरकोली ता.पंढरपूर येथील छाया मागाडे हि वृद्ध महिला कामासाठी घरातून बाहेर पडल्या खऱ्या पण स्मृतिभंशाचा त्रास असल्यामूळे त्या घरी जाण्याचा रस्ताच विसरल्या.चालत चालत त्या पंढरपुरात दाखल झाल्या.सदर वृद्धा पंढरपुरातील नवी पेठ परिसरात अस्ताव्यस्त अवस्थेत पडली असल्याची माहिती काही व्यापाऱ्यांनी पंढरपूर नगर पालिकेचे  मुख्याधिकरी अनिकेत मानोरकर व नगरसेवक डी. राज  सर्वगोड यांना दिली.सदर माहिती मिळताच  मुख्याधिकरी यांनी तातडीने उपाययोजना करून व्यवस्थापक संतोष कसबे यांना रुग्णवाहिका सह पाठवून दिले बेघर निवारा व्यवस्थापक मुबारक शेख व सहकाऱ्यांनी तातडीने उपजिला रुग्णालय येथे वैदिकिय तपासणी करून माऊली शहरी बेघर निवारा येथे दाखल केले. 

        नगरसेवक डी. राज सर्वगोड यांनी तातडीने सदर महिलेच्या कुटूंबाचा ठावठिकाणा  शोध सुरु केला. तर माउली बेघर निवास येथे  महिला कळजिवाहक सलामत तांबोळी यांनी तातडीने सदर वृद्धेस अंघोळ घालून नवीन कपडे परिधान करून धीर दिला. वृद्ध महिला तीन दिवसापासून उपासी असलेने अशक्तपणा जाणवत होता त्यांना निवारा मधून नाष्टा, चहा, जेवण दिले कही वेळानंतर शुद्ध अलेने त्यांच्याकडून  कुटुंबाची माहिती घेतली असता  त्या सरकोली येथील असले चे खात्री झाले नंतर मुख्याधिकारी नगरसेवक डी राज. सर्वगोड यांनी काही तासातच कुटुंबाचा शोध लावून मुलगा अमोल मागाडे यांना बेघर निवारा येथे बोलावून घेतले वृद्ध अाईस कुटुंबियांच्या ताब्यात दिले.
मागाडे कुटुंबीय तीन दिवसापासून शोध घेत होते त्यांना डी राज सर्वगोड यांच्यामूळे  मुळे अाईचा शोध लागला .

  नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व नगरसेवक डी.राज सर्वगोड  व नगरपरिषदेचे बेघर निवारा व्यवस्थापक, कळजीवहक यांचे आभार मानताना  कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *