ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

कोरोना लस घेण्यासाठी नोंदणी करण्याचे न.पा.आरोग्य विभागाचे आवाहन

          भारतामध्ये १)कोव्हिशील,२)कोव्हॉक्सीन,३)झायकॉकD, ४)स्पुटनीकV, ५)NVX-COV2373  ६)प्रोटीन अँटिजनवर आधारित लस,७)HGCO-19, ८)भारत बायोटेक ची लस ९)ऑरोव्हँक्सीन या ९ लसी क्यिनिकल ट्रायलमध्ये आहेत. पुढील  महीन्यात कोव्हीड साठी लसीकरणाला सुरवात होणार असल्याने लसिकरणाच्या पहिल्या टप्यासाठी वैद्यकीय सेवा, आरोग्य विभागा संर्दभातील नागरिक तसेच औषध विक्रेत्यांनी रजीस्ट्रेशन करून नोंदणी करावी असे आवाहन करण्यात  आले. काही माहीती हवी असल्यास, अधिक माहीती साठी आरोग्य विभाग किंवा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले यांचेशी संपर्क करावा असे सांगितले. पंढरपुरातील अधिकारी, कर्मचारी यासंर्दभातील प्रशिक्षण घेत असल्याचे आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले.

          सदर मिटिंगमध्ये आरोग्य समिती सदस्य नगरसेवक संजय निंबाळकर, नगरसेविका शकुंतला नडगीरे, अर्चना रानगट, अनुशया शिरसट यांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला तर बाळासाहेब कदम यांनी विषयांचे वाचन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *