ताज्याघडामोडी

पंढरीत चंद्रभागेच्या महाआरतीस पुनश्च प्रारंभ

पंढरीत चंद्रभागेच्या महाआरतीस पुनश्च प्रारंभ 

राज्य शासनाने राज्यातील मंदिरे खुली करण्यास परवानगी दिल्यानंतर विठ्ठल मंदिराचे दारे भाविकांसाठी खुली करण्यात आली असून त्याच बरोबर आता गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेली विश्वशांती केंद्र आळंदी आणि माईस एमआयटी पुणे याच्या वतीने नित्यारोज करण्यात येणारी चंद्रभागेच्या महाआरती पुन्हा सुरु करण्यात आली आहे.सोमवारी दीपावली पाडव्याच्या निमित्ताने पंढरपूर शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड. राजाभाऊ भादुले यांच्या हस्ते महाआरतीचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी विठ्ठलभक्त सचिन प्रकाश जगताप मु.पो.भातागळी जिल्हा लोहारा,मंदिर सुरक्षा कर्मचारी सागर बोरगे हेही उपस्थित होते.  
      या बाबत अधिक माहिती देताना या महाआरतीचे पुरोहित दत्तात्रय बडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संस्कृती,परंपरा आणि तत्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक त्यागमूर्ती वै.प्रयाग अक्का कराड यांच्या संकल्पनेतुन चंद्रभागेच्या महाआरती सुरु करण्यात आली होती.गेल्या पाच वर्षांपासून सुरु असलेली हि महाआरती मार्च २०2० मध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बंद करण्यात आली होती.आता दीपावली पाडव्यापासून महाद्वार घाटावरून रोज सायंकाळी सव्वासात वाजता नियमितपणे सुरु राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *