

एमएचटी-सीईटी २०२० ही परीक्षा दि. ०१ ते २० ऑक्टोबर २०२० दरम्यान होणार
पंढरपूर- सायन्स शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण लक्ष आता अभियांत्रिकी व फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे. कोरोना महामारीचा वाढता प्रसार पाहता शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ करीताची सीईटी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. सीईटी सेल कडून दि. ०९ सप्टेंबर २०२० रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार ‘एमएचटी-सीइटी २०२०’ ही परीक्षा दि. ०१ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२० या कालावधीत पीसीएम व पीसीबी या दोन गटात खाली दिलेल्या तारखांना स्वतंत्रपणे घेतली जाणार असल्याचे कळविले आहे. पीसीबीच्या विद्यार्थ्यांकरीता दि.०१,०२, ०४, ०५,०६,०७,०८,०९ ऑक्टोबर २०२० असे आठ दिवस परीक्षा असणार आहे तर पीसीएम ग्रुप असणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता दि. १२,१३,१४,१५,१६, १९ व २० ऑक्टोबर २०२० असे सात दिवस परीक्षा असणार आहे. सदर परिक्षेबद्दल वेळोवेळी प्राप्त होणारी माहिती विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल. अधिक माहितीसाठी www.mahacet.org या वेबसाईटला भेट द्यावी तसेच प्रा.उत्तम अनुसे (मोबाईल नंबर – ९१६८६५५३६५) यांना संपर्क साधावा असे आवाहन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी यांनी केले आहे.