ताज्याघडामोडी

आढीव विसावा जि.प.प्राथमिक शाळेच्या मागे जुगार खेळणाऱ्यांवर तालुका पोलिसांची कारवाई 

आढीव विसावा जि.प.प्राथमिक शाळेच्या मागे जुगार खेळणाऱ्यांवर तालुका पोलिसांची कारवाई 

८ जणांविरोधात गुन्हा दाखल तर रोख रक्कम जप्त 

पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमागे काही इसम मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत ८ इसमांविरोधात मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याबद्दल पो.काँ.देवेंद्र हिंदुराव सुर्यवंशी बं.नं.1491 नेम-पंढरपुर तालुका पोलीस ठाणे यांनी सरकारच्या वतीने मुंबई जुगार प्रतिबंध कायदा1887 कलम12(अ) नुसार दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   मौजे-आढीव विसावा गावचे शिवारातील जिल्हा परिषद प्राथमिक शाऴेचे पाठीमागे काही इसम 52 पत्त्याचे पानावर मन्ना नावाचा जुगार खेळत असलेची बातमी मिळाल्यानंतर सपोनि खरात सो।, पोसई वसमळे सो., पोक/1486 नरळे हे घटनास्थळी गेले असता ठिकाणी गेले असता तेथे काही इसम गोलाकार बसुन मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसले. त्यांना आम्ही गराडा घालुन जागीच पकडले.ती वेळ 17/30 वा.ची होती. त्यावेऴी एक इसम पोलिसांना पाहुन धक्का देवुन पऴुन जात असताना पडला. त्यास पाठलाग करुन पकडुन त्याचे नाव विचारले त्याने त्याचे नाव बाऴु गोरख झेंडे वय 50 वर्षे रा. आढीव ता. पंढरपुर असे असल्याचे सांगितले. लागलीच त्या पकडलेल्या इसमांना पंचासमक्ष नावे गावे पत्ते विचारले असता त्यांनी नावे अनुक्रमे खालील प्रमाणे समक्ष सांगितली आहेत.1) भारत पांडुरंग वाघमारे वय-23 वर्षे रा.आढीव विसावा ता. पंढरपुर रोख रक्कम 200 रुपये 2) मच्छिंद्र गोरख झेंडे वय-70 वर्षे रा. आढीव विसावा ता. पंढरपुर रोख रक्कम 150 रुपये 3) योगेश जगन्नाथ झेंडे वय-40 वर्षे रा.आढीव विसावा ता. पंढरपुर रोख रक्कम 140 रुपये 4)दिनेश तुकाराम जाधव वय-48 वर्षे रा. आढीव विसावा ता. पंढरपुर रोख रक्कम 170 रुपये 5)सिध्देश्वर उत्तम आधटराव वय-30 वर्षे रा.भटुंबरे ता. पंढरपुर रोख रक्कम 110 रुपये 6) बाऴु गोरख झेंडे वय 50 वर्षे रा. आढीव ता. पंढरपुर रोख रक्कम 90 रुपये तसेच आम्हांला पाहताच दोन इसम पऴुन गेले. त्यांचे नाव व पत्ता याबाबत चौकशी केली असता त्यांची नावे 7) सहदेव दादा कांबळे वय-54 वर्षे रा.आढीव विसावा ता.पंढरपुर 8) मनोहर दादा कांबळे वय- 75 वर्षे रा. आढीव विसावा ता. पंढरपुर असे असल्याचे समजले.
पंढरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेल्या पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आढीव परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *