ताज्याघडामोडी

धाराशिव साखर कारखाना युनिट३ शिवणी (जा) कारखाना पाच लाख गाळप करणार:- चेअरमन अभिजीत पाटील

धाराशिव साखर कारखाना युनिट३ शिवणी (जा) कारखाना पाच लाख गाळप करणार:- चेअरमन अभिजीत पाटील

धाराशिव साखर कारखाना युनिट३च्या सन २०२०-२१❝पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ❞ आज प्रगतशील शेतकऱ्यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

याशुभप्रसंगी कारखाना लगतच जिरगा मारूतीचे मंदीर असून अभिषेक करण्यात आला. काटा पुजन करून ऊस भरून आलेल्या वाहनांचे पुजन करून व गव्हाणीत

कारखाना भागातील प्रगतशील शेतकऱ्यांना मोळी टाकण्याचा मान देऊन समाजात चेअरमन अभिजीत पाटीलयांनी वेगळाच ठसा उमटवला आहे.
प्रगतशील शेतकरी म्हणून कैलासगिर महाराज, व्यंकटराव आरसुळे, नामदेवराव गवते, तुकाराम लुटे, शिवाजी चव्हाण, रामराव वाके, व्यंकटराव कदम, एकनाथ ढोणे, ज्ञानेश्वर जामगे, नागनाथ कुसनुरे, नागोराव घुमे, पंढरी वानखेडे, रामराव पवार, गंगाधर बोमनाळे, ज्ञानेश्वर देसाई तसेच कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक संतोष काबंळे, सुहास शिंदे व गौरव दोशी, छावा संघटनचे माऊली पवार आदी मान्यवरांच्या शुभहस्ते मोळी टाकण्यात आली.

यंदा पाऊसकाळ चांगला झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचं वातावरण आहे. ऊस टनेजमध्ये ही भरपूर प्रमाणात वाढ आहे. यंदा ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने भागातील सर्व शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यास गाळपास आणू. शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देऊन येथील शेतकऱ्यांला सुजलाम सुफलाम करू.पुढील काही दिवसांपासून ऊस उतारा जास्त मिळावा यासाठी प्रशिक्षण शाळा गावोगावी देण्यात येईल. ज्युस ते इथेनॉलची हि प्रक्रिया सुरू करण्याचे हि चेअरमन अभिजीत पाटील यानी सांगितले.

यावर्षी पाच लाख मे. टन गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कर्मचारी व शेतकरी हा कारखानादारीचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या हस्ते मोळी टाकून तर कर्मचाऱ्यांना पगार वाढीची घोषणा चेअरमन अभिजीत पाटील यांनी केली.

यावेळी भागातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, पत्रकार बांधव,कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शेतकरी बांधव, वाहतूक ठेकेदार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *