ताज्याघडामोडी

पाणी पुरवठा लिहलेल्या वाहनातून सुस्ते परिसरातून अवैध वाळू वाहतूक 

पाणी पुरवठा लिहलेल्या वाहनातून सुस्ते परिसरातून अवैध वाळू वाहतूक 

पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाईत टेम्पो,दुचाकीसह २ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावालगतच्या भीमा नदीच्या पात्रातून  होणाऱ्या अवैध वाळू उपशावर व वाहतुकीवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी पहाटे कारवाई करण्यात आली असुन या कारवाईत एक बदामी रंगाचा टाटा कंपनीचा 407 माँडेलचा पाणी पुरवठा लिहलेला बिगर नंबरचा टेम्पो,त्यास पाठीमागे हौदामध्ये दोन ब्रास वाळु,तसेच मोटारसायकल क्रंमाक MH13 BP 3928 आदी २ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
   या बाबतचे सविस्तर वृत्त असे कि, 2/10/2020 रोजीचे पहाटे 5.00 वा.चे पर्यत डिव्हीजन चेकींग नाईट राऊड असल्याने फिर्यादी पो.काँ.हणुमंत गोरख भराटे बन.25 नेम पंढरपुर तालुका पोलीस ठाणे यांच्यासह तालुका पो.नि.किरण अवचर,पो.हे.काँ. मोरे,पो.काँ.ठाणेकर,चालक.पो.काँ.वाघमारे असे डिव्हीजन चेकींग नाईट राऊड करिता आहिल्या देवी चौक ,नारायणचिंचोली ,तुंगत,मगरवाडी करीत मौजे-तारापुर गावातील तारापुर नाला येथे आले असताना सुस्ते गावाकडुन एक चार चाकी वाहन व त्यांचेपुढे मोटारसायकल येत असल्याचे दिसले व सदर वाहनाचा आम्हास संशय आल्याने  मोटारसायकल स्वार व टेम्पो चालकास हाताचे इशारा करुन सदरचे वाहन थांबविले असता सदर अवैध वाळू उपसा व वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. 
      या प्रकरणी 1) श्रीपात भारत वसेकर वय-24 वर्षे 2) मुन्ना आल्लामी तांबोळी वय-21 वर्षे )यलाप्पा तानाजी गायकवाड वय-20 वर्षे तिघे रा-टाकळी सिंकदर ता-मोहोळ जि-सोलापुर 4) शाम नेताजी भोसले वय-19 वर्षे,रा-सरकोली ता-पंढरपुर यांचेविरुध्द सरकारतर्फे भा.द.वि.कलम 379,34 सह गौणखनिज कायदा 1978 चे कलम 4(1), 4(क) , (1),21प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *