ताज्याघडामोडी

पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावरील सिद्धेवाडी येथून ३५ ट्री-गार्डची चोरी

पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावरील सिद्धेवाडी येथून ३५ ट्री-गार्डची चोरी 

मंदिर समितीच्या वतीने फिर्याद दाखल 
श्री विठ्ठल मंदिरे समितीकडून पंढरपुर ते मंगळवेढा रस्त्यालगत गतवर्षी देशी चिचेंची लिंबाची,पिंपळाची, वडाची व आंब्याची झाडे गोपाळपुर,अनवली, सिध्देवाडी, या जाणारे रोडलगत लावण्यात आली होती.सदर झाडाला संरक्षण व्हावे म्हणुन लोखंडी पिंजरे (ट्री गार्ड ) लावले होते.याची देखभाल मंदिर समितीचे कर्मचारी अरुण विठ्ठल सलगर यांच्यावर सोपविण्यात आली होती.
  दिनांक १ ऑक्टोबर रोजी  05/00 वा.चे.सुमारास अरुण विठ्ठल सलगर सदरची झाडे व ट्री गार्ड बघण्याकरिता आहेत का हे बघण्यासाठी  गेले असता सचिन जाधव रा.सिद्धेवाडी यांची शेतालगत असलेल्या झाडाची व ट्री गार्ड लावलेल्या झांडापैंकी 35 झाडाचे ट्री गार्ड (पिंजरे) दिसुन आले नाहीत.सदरचे ट्री गार्ड कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची खात्री पटल्याने मंदिरे समितीच्या वतीने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.          

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *