Uncategorized

स्वेरीमध्ये कै.रामदास महाराज जाधव, भागवताचार्य कै. वा. ना. उत्पात आणि मिस्त्री कै.विठ्ठल पवार यांना श्रद्धांजली

स्वेरीमध्ये कै.रामदास महाराज जाधवभागवताचार्य कै. वा. ना. उत्पात णि मिस्त्री कै.विठ्ठल पवार यांना श्रद्धांजली

पंढरपूर- सध्याच्या कोरोना महामारीच्या काळामध्ये फार दुर्दैवी गोष्टी घडत असून जर पंढरपूर परिसराचा विचार केला तर प्रचंड हानी झाली असून आपण खूप मोठी माणसे गमावली आहेत. ही झालेली हानी कधीच भरून निघणार नाही.’ अशी भावना गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी व्यक्त केली.

       अकस्मात निधन झालेल्या या महान विभूतींना स्वेरीमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे हे आपल्या भावना व त्यांच्या सहवासातील अनुभव सांगत होते. प्रारंभी या महान विभूतींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. श्री. संत कैकाडी महाराजांचे पुतणेक्रांतीकारी संत कै.रामदास महाराज जाधव यांच्याविषयी बोलताना डॉ. रोंगे म्हणाले की, ‘धर्म व अधर्म याची सांगड तोडण्याचा प्रयत्न करून आध्यात्मिक क्षेत्रात  कै. जाधव महाराज यांनी ठसा व दबदबा निर्माण केला. त्यांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून येणार नाही.’ भागवताचार्य वा. ना. उत्पात यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते म्हणाले कि, ‘भागवताचार्य वा.ना. महाराज समाजातील अनेक घटकांचे मार्गदर्शक होते. त्यांचा मराठी विषयाबरोबरच संस्कृतसंत साहित्यसंत वाडःमय या विषयावर प्रचंड प्रभुत्व होते. धार्मिकआध्यात्मिक क्षेत्रात त्यांचा प्रचंड पगडा होता. त्यांच्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलचे विचार आज घराघरात पोहोचले. अशा भागवताचार्य वा. ना. उत्पात महाराज यांच्या निधनाने सांस्कृतिक व संस्कृत साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून येणे अशक्य आहे.’ कै.विठ्ठल पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना डॉ. रोंगे म्हणाले की, ‘स्वेरीला मिळालेल्या उत्तुंग यशाचे साक्षीदार असलेले कै. विठ्ठल पवार मिस्त्री त्यांनी १९९८ साली स्वेरीच्या पायाभरणी पासून ते आजपर्यंत इमारत बांधकामासाठी योग्य मार्गदर्शन केले. सार्वजनिक बांधकाम विभाग असो अथवा इतर संबंधित कोणतेही काम असोते चोखपणे पार पाडायचे. स्वेरीत कोणतेही पाहुणे आले तर त्यांची सोय ते निरपेक्ष भावनेने व उदारतेने करत असत.’ स्वेरी अंतर्गत असलेल्या बी. फार्मसीच्या माजी  विद्यार्थिनी कै. ऐश्वर्या अनंत कुलकर्णी यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी डॉ. रोंगे म्हणाले कि, ‘सन २०१८-१९ मध्ये बी.फार्मसी उत्तीर्ण झाल्यानंतर त्या पुण्यातील कंपनीमध्ये नोकरी करत होत्या त्यांच्या अकस्मात निधनाने निरागस हास्य लोपले.’ शेवटी दोन मिनिटे मौन बाळगण्यात आले. यावेळी पालक सोमनाथ थिटेस्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा.एम. एम. पवारबी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियारडिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळडी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवेयांच्यासह सर्व अधिष्ठातासर्व विभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *