ताज्याघडामोडी

कोरोना बाधितांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ द्या- आ.भारत भालके

कोरोना बाधितांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ द्या- आ.भारत भालके

तालुक्यातील विविध प्रश्नांवर शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन

कोरोना बाधित रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्नित  असलेल्या  रुग्णालयांमधून रुग्णांना  लाभ द्या   तसेच या योजनेतंर्गत लाभ देण्यासाठी संबधितांना योग्य ते मार्गदर्शन करावे अशा सूचना आमदार भारत भालके यांनी दिल्या.

             कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, अतिवृष्टी  तसेच तालुक्यातील विविध प्रश्नांवर शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसिलदार वैशाली वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, गटविकास अधिकारी  रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. जयश्री ढवळे,  वनपरिक्षेत्र अधिकारी विलास  पवळे सहायक निबंधक एस.एम तांदळे तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी  आमदार भालके म्हणाले,  महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्नित रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन सहाय करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्यमित्र यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत  लाभ देण्यासाठी करावे. तसेच इतर आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होणार यांची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तात्कळ सादर  करावा. अतिवृष्टिने खंडीत झालेला वीज  पुरवठा वीज वितरण कंपनी तात्काळ पुर्ववरत करावा, जिल्हा व सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिवृष्टिने वाहून गेले रस्ते, पुल यांची पाहणी करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना आमदार भालके यांनी यावेळी संबधिताना दिल्या.

             यावेळी आमदार भालके यांनी  बैठकीत शिक्षण, कृषि,सहकार, तहसिल, आरोग्य, महिला व बालविकास, प्रधानमंत्री आवास योजना,रोजगार हमी योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, दलीत वस्ती सुधार वस्ती योजना आदी विभागांचा आढावा घेतला.

                  अतिवृष्टिने नुकसान झालेल्या भागाची व आवश्यक तिथे तात्काळ करण्यात आलेल्या  उपाययोजना, राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात आलेले भूसंपादन  तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सुरु असलेल्या व करण्यात येणाऱ्या  कामांची माहिती   प्रांताधिकारी ढोले यांनी  यावेळी  दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *