ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरातील पूरग्रस्त वर्ष झाले तरी भरपाई पासून वंचित 

पंढरपूर शहरातील पूरग्रस्त वर्ष झाले तरी भरपाई पासून वंचित 

अँड.कीर्तिपाल सर्वगोड करणार २१ सप्टेंबर पासून आमरण उपोषण
गेल्या वर्षी दिनांक ७/८/२०१९ ते दिनांक ९/८/२०१९ पंढरपूर येथील चंद्रभागा नदीला पुर आल्यामुळे नदी काठा जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, गोंधळी गल्ली, रमाई आंबेडकर नगर, विठ्ठल नगर, भाई-भाई चौक, रोहिदास चौक, कुष्ठरोग वसाहत, विप्र दत्त घाट, बंकटस्वामी मठ परिसर, कालिकादेवी चौक, गुजराती कॉलनी, नागपूरकर मठ पाठीमागील भाग, इत्यादि ठिकाणी चंद्रभागा नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने या परिसरातील लोकांचे अतोनात नुकसान झालेले होते.  
या परिसरात दिनांक ७/८/२०१९ ते दिनांक ९/८/२०१९ पर्यन्त  लोकांचे घरामध्ये पाणी गेल्याने घरातील, अन्न धान्य भिजणे, कपडे खराब होणे, घराच्या भिंतीचे नुकसान होणे, महत्वाचे साहित्य वाहून जाणे, अशा अनेक प्रकारचे नुकसान झालेले आहे. त्याच प्रमाणे या परिसरातील लोक मजुरी करून उपजीविका भागवितात, पुर आलेमुळे या लोकांचा रोजगार बुडाला आहे. चंद्रभागा नदीची पाण्याची पातळी वाढणार म्हणून पंढरपूर नगर परिषदेने आठ (८) दिवसापूर्वी जाहीर केल्यापासुन या परिसरातील लोक रोजगार बुडवून घरी होते. या परिसरातील बर्‍याच लोकांची उपजीविका रोजच्या रोजगारावर अवलंबून आहे.
या परिसरातील कुटुंबांच्या घराजवळ, घराचे पाठीमागील भिंतीस, दरवाज्याजवळ, उंबरठ्याजवळ, घरच्या पायरीजवळ, घराचे अंगणात चंद्रभागा नदीच्या पुराचे पाणी जावून सुद्धा व पुरामुळे या परिसरातील कुटुंबांचे नुकसान होऊन सुद्धा प्रशासनाने या भागातील काही कुटुंबांना नुकसान भरपाई देण्यापासून वंचित ठेवले आहे. हे नुकसान होऊन 1 वर्ष पूर्ण झालेत. तरी सुद्धा प्रशासन नुकसान भरपाई पासून वंचित कुटुंबांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहेत.  
या परिसरातील नुकसान भरपाई पासून वंचित कुटुंबांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून सोमवार दिनांक 21/09/2020 रोजी पासून नुकसान भरपाई पासून वंचित असलेल्या कुटुंबांना नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यन्त पंढरपूर येथील तहसील कार्यालय येथे सकाळी 11-00 वा. पासून “आमरण उपोषण” करण्यात येणार आहे. उपोषण करताना कोरोणा महामारी संदर्भात प्रशसानाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून उपोषण करण्यात येणार आहे. हे उपोषण संविधानिक रित्या लोकशाही मार्गाने करत असताना कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *