ताज्याघडामोडी

लायन्स व लायनेस क्लब पंढरपुर मार्फत नगरपालिकेच्या कोव्हीड हॉस्पिटल साठी पिपीई किट, थर्मल गन, पल्स ऑक्सिमिटर उपकरणांची भेट

लायन्स व लायनेस क्लब पंढरपुर मार्फत नगरपालिकेच्या कोव्हीड हॉस्पिटल साठी पिपीई किट, थर्मल गन, पल्स ऑक्सिमिटर उपकरणे देण्यात आली

जनसेवेस रुजु झाल्याबद्दल आरोग्य सभापती परदेशी यांचे लायन्स संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले

*लायन्स व लायनेस क्लब पंढरपुर मार्फत नगरपालिकेच्या कोव्हीड हॉस्पिटल साठी पिपीई किट, थर्मल गन, पल्स ऑक्सिमिटर उपकरणे देण्यात आली*

*जनसेवेस रुजु झाल्याबद्दल आरोग्य सभापती परदेशी यांचे लायन्स संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले*

कोरोनाचे पेशंट वाढतच चालले आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत आहे. अशा प्रसंगी पंढरपूर नगरपालिकेने नागरिकांसाठी आत्याधुनीक मोफत कोव्हीड हॉस्पिटला सुरवात केली.मुख्याधिकारी, नगराध्यक्षा व आरोग्य सभापती यांनी पंढरपूर मधील सामाजिक संस्था व दानशुर व्यक्तींना मदतीसाठी अवाहन केले होते. आपल्या गावातील खरी गरज शोधुन ती गरज पुर्ण करण्याचे प्रयत्न लायन्स संस्था आजपर्यंत करत आली आहे. जेथे गरज आहे तेथे श्रम दान केले, मार्गदर्शन केले तसेच वस्तु रुपाने सेवा रुपाने मदत करत आहे, आर्थिक मदत करत आहे. या प्रसंगी इंटरनॅशनल लायन्स क्लब कडून २० पिपीई किट, थर्मल गन मशीन, पल्स ऑक्सिमिटर मशीन ही उपकरणे नगराध्यक्षा साधनाताई भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्याकडे नगरपरिषद संचलीत कोव्हीड हॉस्पिटलसाठी सुपूर्द केले. त्यावेळी नगराध्यक्षा मा. साधनाताई भोसले यांनी योग्य वेळी, योग्य मदत दिल्या बद्दल लायन्स संस्थेचे आभार मानले. अध्यक्ष सुजाता गुंडेवार यांनी या अगोदरही आम्ही नगरपालिकेचे दवाखान्यासाठी मदत केली होती. या पुढेही लायन्स संस्था मदतीसाठी तत्पर राहील असे सांगितले.

तसेच लायन सदस्य व नगरपालिका पंढरपूरचे आरोग्य समिती सभापती ला.विवेक परदेशी यांना कोरोनाकालावधीमध्ये आपली सेवा बजावत असताना दिनांक ०७ ऑगस्ट रोजी कोरोना बाधा झाली होती त्यातून ते सुखरूप बाहेर पडुन जनसेवेस रुजु झाल्या बद्दल लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीने नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सदस्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून आपला आनंद व्यक्त केला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, ला.ललिता कोळवले, ला.रा.पां. कटेकर, ला.कैलास करंडे ला.भारत वाघुले,आरोग्य समिती सभापती ला. विवेक परदेशी, नगरसेवक डि.राज.सर्वगोड, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, वैद्यकीय अधिकारी बजरंग धोत्रे हे उपस्थित होते. मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी संस्थेचे आभार मानले व संस्थेच्या भावी कार्याला शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *