ताज्याघडामोडी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग  

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग 

पंढरीत घंटानाद आंदोलन करणाऱ्या भाजपच्या जिल्हाध्यक्षासह १० आंदोलकांवर गुन्हा दाखल

राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात यावेत यासाठी २९ ऑगस्ट रोजी भाजपच्या वतीने राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले होते.पंढरपुरातही नामदेव पायरी नजीक भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह भाजपच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.मात्र या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाचा भंग झाल्याने या आंदोलनात सहभागी असलेल्या १० जणांविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भादवि.क.269,188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
       दि.29/08/2020रोजी चे 11/00वा.चे सुमारास नामदेव पायरीचे समोर दर्शन मंडपा लगत 1) बादलसिंग ठाकुर माझी शहर अध्यक्ष भाजप 2) श्रीकांत देशमुख जिल्हा अध्यक्ष भाजप 3) कृष्णा वाघमारे 4) अनिल अभंगराव 5)गणेश मधुकर अंकुशराव 6)शकुंतला नडगेरी 7)शिरीश कटेकर 8)गुरूदास अभ्यंकर 9) अमोल डोके सर्व रा-पंढरपूर10)राजाभाऊ जगदाळे, रा-उपरी ता-पंढरपूर तसेच इतर 10ते 12लोक हे सदर ठिकाणी आले व सध्या कोरोना सारखा सनसर्ग जन्य रोगाचा प्रादुर्भाव असल्याने तसेच मा जिल्हाधिकारी सो सोलापूर यांचे कडील जावक क्र.2020/डिसीबी-02/आरआर नं.3421दि.31/07/202,आदेश क्र.DMU/2020/CR-92/DISM-1दि. 29/07/2020फौजदारी प्रक्रिया सहिंता 1973चे कलम 144नुसार आदेश असताना वरील लोकांपैकी काही लोक विना मास्क तसेच त्यांनी उभे राहताना सोशल डिस्टींगचे पालन न करता गर्दीने एकत्र येऊन कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणेची परिस्थिती निर्माण करून घंटानाद आंदोलन केले आहे.त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी यांचे आदेशाचा भंग केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे   

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *