धर्मराज घोडके मित्रमंडळाच्या वतीने कर्तव्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना फराळ व पाणी बॉटल वाटप
गेल्या साडेचार महिन्यापासून राज्यासह पंढरपूर शहर व तालुक्यात पोलीस प्रशासन अतिशय दक्षतेने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कर्तव्य पार पाडत आहे.ऊन,पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र परिश्रम घेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याप्रति कृतज्ञतेची भावना म्हणून धर्मराज घोडके मित्रमंडळाच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांना केळी,फराळ व पाणी बॉट्लचे वाटप करण्यात आले. या बाबत समाजसेवक धर्मराज घोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार पंढरपूर शहरात ७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट या काळात लॉकडाऊनची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली.या काळात शहरात विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी जाऊन आज श्रावणी सोमवार निमित्त केळी,फराळ व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पडणाऱ्या या पोलीस बांधवाचे कार्य खरोखरच अभिमानास्पद आहे असे सांगितले.तसेच शहरातील नागरिकांनी अँटीजेन तपासणीसाठी पुढे यावे असे आवाहन देखील धर्मराज घोडके यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी त्यांच्या समवेत विश्वनाथ गोरे,पंकज तोंडे,गणेश देसाई, सचिन लिंगे युवराज सलगर ,पांडूरंग डोके संदिप लिंगे आदी उपस्थित होते.