ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन सायन्स कॉलेज शेळवेचा १२ वी परीक्षेत १०० % निकाल

कर्मयोगी विद्यानिकेतन सायन्स कॉलेज शेळवेचा
१२ वी परीक्षेत १०० % निकाल

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी च्या परीक्षेचा निकाल आज दिनांक १६.०७.२०२० रोजी लागला त्यामध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.
सोलापूर जिल्ह्यामध्ये कर्मयोगीने १२ बारावी सायन्स मध्ये उज्वल यश प्राप्त केल्याची माहिती शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ.श्री.ए.बी.कणसे यांनी दिली. कर्मयोगी विद्यानिकेतन हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न करत असते सदर विद्यार्थ्याकडून दररोज १२ तास अभ्यास करून घेतला मुळे हे यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना दररोज सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शिकवले जाते व सायंकाळी ५ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत अभ्यास करून घेतला जातो.
या १२ वी सायन्सच्या परीक्षेमध्ये अमृता डिसले ८१.६४ % विनोद आसबे याने ७८.००% संचिता फाळके हीने ७६.६१ % गुण मिळवून प्रशालेमध्ये अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला तसेच इतर विषयांमध्ये विनोद आसबे येणे गणित विषयात ९८ गुण व आय.टी.मध्ये ९७ गुण, नागेश गाजरे याने गणितामध्ये ९३ गुण तसेच सुमित पावर याने बॉयलॉजी मध्ये ९३ गुण तर अमृता डिसले हिने बायलॉजी मध्ये ९० गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांनी ७५ % वर गुण मिळवून कॉलेजचं नाव लौकीक केलं आहे तसेच सालाबादप्रमाणे याहीवर्षीही १०० % निकालाची परंपरा अविरत चालू ठेवले आहे.
सदर विद्यार्थ्यांना प्राध्यापक श्री शिंदे आर.एस. सर, श्री देशपांडे सर, श्री वाघमारे सर व सौ मनीषा शिंदे मॅडम या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *