गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरीत अकबरअली नगर परिसरात गोवा,विमल गुटखा व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त

पंढरीत अकबरअली नगर परिसरात गोवा,विमल गुटखा व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त

सद्दाम तांबोळी विरोधात गुन्हा दाखल 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण शहरात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवसाय बंद असताना पंढरपूर शहरात मात्र व्यसनी लोकांची तलफ भागविण्याचे काम काही मंडळी अगदी चोखपणे करीत असल्याचे दिसून येते.जिल्हाधिकारी सोलापूर यांनी २० मार्च पासूनच जिल्ह्यातील सर्व पानपट्टी बंद ठेवावेत असे आदेश काढले मात्र गुटखा व मावा प्रेमी लोकांसाठी चोरून सेवा बजावत दुप्पट नफा कमविण्याचे तंत्रही गुटखा मावा विक्रेत्यांनी शोधून काढल्याचे दिसून येते.पंढरपूर शहर पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर यांनी असाच गंभीर प्रकार उघडकीस आणला असून पंढरपूर शहरातील अकबरअली नगर येथील सद्दाम रज्जाक तांबोळी यांच्या घरी धाड टाकून विमल व गोवा गुटखा तसेच सुंगधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. 
      अकबअरली नगर येथे चोरून गुटखा विक्री होत असल्याची माहिती पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर यांना मिळाली होती.या बाबत त्यांनी अन्न निरीक्षक यांना माहिती देत सदर ठिकाणी येण्याची विनंती केली.सदर ठिकाणी तपासणी वेळी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू – नारंगी पाउच x रु. प्रत्येकी 6400 2). रत्ना सुगंधित तंबाखू9 पाउच x रु. प्रत्येकी 25944 3). बजाज सुगंधित तंबाखू पाउच x रु. प्रत्येकी 3145 4). खुला सुगंधित तंबाखू किलो x रु. प्रत्येक किलो1200 5). राजविलास पान मसाला3 पाउच x रु. प्रत्येकी 4760 6). एन पी सुगंधित तंबाखू 3 पाउच x रु. प्रत्येकी 1050 7). गोवा गुटखा 2 पाउच x रु. प्रत्येकी 3080 8). विमल पान मसाला1 पाउच x 12 रु. प्रत्येकी 2520 9). व्ही सुगंधित तंबाखू1 पाउच x रु. प्रत्येकी 630 एकूण 48729 या प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्रीसाठी साठवणूक केली असल्याचे दिसून आले.
सदर प्रकरणातील आरोपी सद्दाम तांबोळी याने अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 मधील शिक्षापात्र कलम 59 तसेच मा. अन्न सुरक्षा आयुक्त, मुंबई यांची अधिसूचना क्र. असुमाअ 901/7 दि. 19/07/2019 चे उल्लंघन केले असून सदर बाब उपरोक्त कायद्याच्या कलम 59 अन्वये दंडनीय आहे. त्यामुळे सद्दाम रज्जाक तांबोळी यांचेवर अन्न सुरक्षा अधिनियम शिक्षापात्र कलम 59, भारतीय दंड संहिता (भादवी) कलम 188, 272, 273, 328 तसेच मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश जा.क्र. 2020/डीसीबी/2/आरआर/2019दिनांक 28/03/2020 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील योग्य त्या कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात यावा अशी फिर्याद अन्न निरीक्षक कुचेकर यांनी दाखल केली आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *