ताज्याघडामोडी

कासेगाव येथे अवैध दारू व ताडीची विक्री सुरु असल्याचे उघड

कासेगाव येथे अवैध दारू व ताडीची विक्री सुरु असल्याचे उघड

पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई 
एकीकडे राज्य शासन केवळ जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरु ठेवून कोरोनाचा  प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करीत असतानाच पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे विदेशी बनावटीची देशी दारू व ताडीची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार स.पो. नी खरात, पो.ना. माळी, पो. ना.ताटे यांच्या पथकाने केलेल्या पोलीस कारवाईत उघड झाला आहे.या घटनेची कासेगाव परिसरात मोठी चर्चा होत असून त्याच बरोबर ताडी विक्रीही होत असल्याचे निर्दशनास आली आहे. 
  या बाबत तालुका पोलीस ठाण्यात पोलीस नाईक श्रीराम ताटे यांनी दाखल केलेल्या फिर्यादी नुसार 1) सखाराम दामु घोडके वय 45वर्ष रा कासेगाव ता पंढरपुर 2) आण्णा मारुती फाळके वय-36वर्षे रा. महादेव नगर कासेगाव ता पंढरपुर 3)महादेव रामा चौगुले वय 47वर्ष रा कासेगाव ता पंढरपुर 4) किसन निवृत्ती भोसले वय-62वर्षे रा कासेगाव ता पंढरपुर यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रोव्हीशन अँक्ट कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *