ताज्याघडामोडी

लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल महिला रुग्णाच्या गळ्यातील दागिना लंपास 

लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल महिला रुग्णाच्या गळ्यातील दागिना लंपास 

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पंढरपुरातील शहरातील प्रख्यात लाईफलाईन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या महिला रुग्णाच्या गळ्यातील सोन्याचे मणी अज्ञात चोरट्याने लंपास केले असल्याची तक्रार या हॉस्पिटलचे व्यवस्थापकाने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. 

       लाईफलाईन हॉस्पटिल येथे दिनांक २५ फेब्रुवारी रोजी शारदा अधिकाराव सूर्यवंशी यांना डोक्यास मार लागला म्हणून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.पहाटे ३.३० ते ४ या वेळेत कुणीतरी सदर रुग्णाच्या गळ्यातील  १० ग्राम वजनाचेसोन्याचे मणी काढून घेतल्याचे डॉ.देशमुख यांना सांगितले.डॉ. देशमूख यांच्या सूचनेनुसार व्यवस्थापक अजय आयरे यांनी फिर्याद दाखल केली आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *