ताज्याघडामोडी

अखेर जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेतली ‘त्या’ तक्रारीची दखल ?

अखेर जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेतली ‘त्या’ तक्रारीची दखल ?

सरकोली येथे महसूल प्रशासन व स्थानिक पोलीस प्रशासकडून दुर्लक्षित अवैध वाळू उपशावर कारवाई

जिल्हा पोलीस पथकाने जेसीबीसह वाहने घेतली ताब्यात 

पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथून रात्रंदिवस बिनधास्तपणे वाळू उपसा केला जात आहे मात्र त्याबाबत स्थानिक पोलिसांकडे अथवा महसूल प्रशासनाकडे तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जात नाही,उलट तक्रारदारासच कुठे वाळू उपसा सुरु आहे ते दाखवा असा तगादा लावला जातो तरी जिल्हा पोलीस प्रमुखांनी या बाबत ठिकाणी सुरु असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करावी अशी तक्रार चारच दिवसापूर्वी सरकोलीचे माजी सरपंच पांडुरंग भोसले यांनी केली होती. अशीच तक्रार जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडेही केली होती.  

        सदर अवैध वाळू उपशास पाठीशी घालणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावरही कारवाई करावी अशी तक्रारही केली होती.मात्र जिल्हा पोलीस प्रमुख यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेत थेट विशेष पथक पाठवून सरकोली येथून मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई केली असल्याचे विश्वासनिय सूत्रांकडून समजते.या कारवाईत जेसीबी सह वाहने ताब्यात घेतली असून या ठिकाणी सुरु असलेल्या अवैध वाळू उपशास जबाबदार असणाऱ्या व तकार करूनही टाळाटाळ करणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यावर आता महसूल प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न पांडुरंग भोसले यांनी उपस्थति केला जात आहे      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *