ताज्याघडामोडी

गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेले तीन संशियत ताब्यात 

गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेले तीन संशियत ताब्यात 

पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई 

पंढरपूर शहर पोलीस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर, पोलीस नाईक डाकवाले, पो.हे.कॉ.ढेरे , पो. खेडकर यांनी शुक्रवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या तीन संशयितांना  ताब्यात घेतले आहे.सदर पोलीस कर्मचारी हे रात्रगस्त करण्यासाठी सांगोला नाका पंढरपूर येथे आले असता तेथे भिंतीच्या आडोशाला तीन इसम अंधारात लपुन बसलेले दिसले. संशय आल्याने त्यांना त्यांची नावे व पत्ते विचारली असता त्यांनी त्यांची नावे सांगण्यास टाऴाटाऴ करू लागले. अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपले नाव 1)पोपट रमेश पवार वय-25वर्षे, 2) संदिप हनुमंत चव्हाण वय-26वर्षे, 3) उत्तम रामलिंग गायकवाड वय 20वर्षे सर्व रा.परिते ता.माढा जि.सोलापूर असे असल्याचे सांगितले.
या बाबत पोलीस हे.कॉ. बिपीन ढेरे यांनी शहर पोलीस ठाण्यात सरकार पक्षातर्फे फिर्याद दाखल केली असून सदर आरोपी हे पोलीस आल्याचे पाहून आपले तोंड झाकुन आपले अस्तित्व लपवुन एखादा दखलपाञ स्वरुपाचा मालाविषयक गुन्हा करण्याचे इराद्याने लपुन बसलेले मिऴुन आले. सदर इसमास सदर गुन्ह्याचे कामी ताब्यात घेतले असून मालाविषयी दखलपात्र स्वरुपाचा चोरीचा गुन्हा करण्याचे उद्देशाने आपले अस्तित्व लपवून चेहरा झाकुन बसलेले मिळून आले आहेत आहेत अशा आशयाची महा. पोलीस कायदा कलम 122(क) प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *