ताज्याघडामोडी

चेक बाऊन्सच्या खटल्यात अडकावून शिक्षा लावण्याची धमकी देणाऱ्या खाजगी सावकारा विरोधात सह.निबंधक कार्यालयाची कारवाई

चेक बाऊन्सच्या खटल्यात अडकावून शिक्षा लावण्याची धमकी देणाऱ्या खाजगी सावकारा विरोधात सह.निबंधक कार्यालयाची कारवाई

पंढरपुरातील खाजगी सावकाराकडून अनेक चेक,कोरे स्टॅम्प जप्त 

१३८ च्या बोगस खटल्याविरोधात प्रथमच धाडसी कारवाई 

पंढरपूर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात खाजगी सावकारांनी अव्वाच्या सव्वा व्याज आकारत व वेळेत व्याजाच्या अथवा मुदलाच्या रकमेची परतफेड न केल्यास त्यावर दिवसागणिक जबर दंड आकारण्याचा पंढरपूर पॅटर्न राबवत लाखोंची माया कमविली असून अशा खाजगी सावकारीचा धंदा करणाऱ्या अनेक सावकारांचे राजकीय गॉडफादर त्यांना अभय देत असल्यामुळें आणि अशा अवैध व जुलमी खाजगी सावकारीच्या माध्यमातून माया गोळा करणाऱ्या महाभागामध्ये गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या अथवा दहशत असलेल्या बाहुबलीची संख्या मोठी असल्याने त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्याचे धाडस सामान्य कुटूंबातील प्रापंचिक सावकार पीडित दाखवत नसल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. अशातच एखादा थोडेफार धाडसी व दंड नाकारणारे कूळ भेटलेच तर भारतीय चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १३८ अन्व्ये त्या विरोधात सिक्युरिटी पोटी घेतलेले चेक बाउन्स करून कोर्टात खटला दाखल केला जातो व सदर प्रकरणातील अपोनन्ट हा आपला मित्र आहे त्याला आपण हातउसने रक्कम दिली असल्याचा दावाही केला जातो. मात्र केवळ चेक बाउन्स झाला आहे एवढ्याच एका बाबीवर कोर्टाचे निर्णय होत असल्याने न्याय व्यवस्थेतील त्रुटींचा हे खाजगी सावकार फायदा उठवीत असल्याचे दिसून येते. 
                पंढरपूर कनिष्ठ न्यायालय व सत्र न्यायालयात अशा प्रकारचे चेक बाउन्सचे शेकडो खटले प्रलंबित असून या पैकी बहुतांश प्रकरणात सदर रकमा या उसनवार दिल्या असल्याचे म्हणणे दाखल करण्यात आल्याचे दिसून येते.मात्र यातील सर्वात मोठे गौडबंगाल म्हणजे ज्यांचे कायदेशीर मार्गाने उत्पन्न वार्षिक लाख दोन लाख आहे,ज्यांचा कुठलाही कायदेशीर इन्कम सोअर्स नाही अथवा जे कुठल्याही प्रकारचा आयकर रिटर्न दाखल करत नाहीत अशा लोकांनी लाखो रुपयांच्या रकमा मैत्रीखातर उसनवार दिल्याचे दिसून येते व अनेक वेळा या लोकांनी दाखल केलेल्या चेकबाउन्स च्या खटल्याची संख्या दोन पेक्षा अधिक असल्याचेही आढळून येते. 
         आज पंढरपूरच्या सह.उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी सारंग सुरेश सांगोलकर यांनी दाखल केलेल्या फिर्यादी नुसार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापुर यांचे कडुन आलेल्या पत्रानुसार अवैध सावकारी व्यवसाय करणारा दिनकर शंकर शिंदे रा . कोर्टी रोड महात्मा फुले नगर पंढरपुर यांची प्राप्त झालेल्या पत्राचे अनुषंगाने चौकशी करून दिनांक 31/01/2020रोजी घर झडती घेतली .घरझडतीत दिनकर शंकर शिंदे हे अवैध सावकारी व्यवसाय करत असले बाबत कागदपत्र प्राप्त झालेले आहेत .त्यांचे वर्णन खालील प्रमाणे -1)बाळासाहेब भगवान सप्ताळ रा तिसंगी ता पंढरपुर 2) नेताजी जगनाथ खरात राशेळके वस्ती सोनके ता .पंढरपुर 3)दिगविजय दत्तात्रय गोडसे रा .महात्मा फुले नगर ता .पंढरपुर 4)रामेश्वर मारूती कारांडे रा. तिसंगी ता.पंढरपुर 5)देविदास शिवाजी कांबळे रा.बागलवाडी .ता सांगोला 6)विठ्ठल जगनाथ खरात रा. शेळके वस्ती सोनके ता.पंढरपुर7)हणमंत अंबादास जाधव रा.बोहाळी ता.पंढरपुर यांचे विरूद्धात दिनकर शंकर शिंदे यांने पंढरपुर कोर्टात एन .आय एँक्ट 138प्रमाणे दाखल केलेले दाव्याचे कागदपत्र ,प्रतीज्ञापत्र ,बँकेचे चेक ,खरेदी खत ,सातबारा उतारा ,हिशोबाच्या पावत्या ,कोरे विड्रल फर्म ,शरद वंसत शिंदे यांचा शंभर रूपयाचा कोरा स्टँम्प व कोरा चेक असे मिळुन आलेले आहेत . सदर प्रकरणाची चौकशी वरून असे निष्पन्न झाले आहे की, दिनकर शंकर शिंदे रा.महात्मा फुले नगर हे सन2016पासुन ते आज तागायत अवैध सावकारी व्यवसाय करतात .गरजु लोकांना दरमहा 5 टक्के व्याजदराने पैसे देतात .त्याचेकडुन कोरे चेक घेवुन कोरे स्टँम्प घेतात .कोरे चेक देवुन पैसे घेणारे लोकांनी मुद्दल व व्याजाचे पैसे दिले नंतर त्यांचे कोरे चेक मागणी केलेवर दिनकर शंकर शिंदे त्या लोकांना तुमच्याकडे आणखी पैसे आहेत .ते द्या नाहीतर मी तुमचे विरूद्ध चेक बंऊन्सची केस कोर्टात दाखल करीन म्हणुन धमकी देतात . दिनकर शंकर शिंदे यांनी नेताजी जगनाथ खरात यांना 60,000/-रूपये ,बाळासाहेब भगवान सप्ताळ यांना 95,000/-रूपये, विठ्ठल जगनाथ खरात यांना 55,000/-रूपये ,देविदास शिवाजी कांबळे यांना 95,000/-रूपये ,रामेश्वर मारूती कारांडे यांना 80,000/-रूपये ,दिगविजय दत्तात्रय गोडसे यांना 1,00,000/-रूपये , हणमंत अंबादास जाधव यांना 1,00,000/-रूपये दरमहा 5टक्के व्याजदराने दिले आहेत .वरिल लोकांनी दिनकर शंकर शिंदे यांना घेतलेले व्याजाचे पैसे मुद्दल व व्याजासह दिले असुन दिनकर शंकर शिंदे हे वरिल लोकांना तुमच्याकडे आणखी पैसे येणे बाकी आहेत ते द्या तुम्ही नाही दिल्यास तुम्ही दिलेले चेक बँकेतुन बऊन्स करून तुमचे विरूद्ध कोर्टात केस दाखल करतो .आशी धमकी देवुन त्यांचे विरूद्ध पंढरपुर कोर्टात एन .आय एँक्ट कलम 138 प्रमाणे दाखल केलेले आहेत . दिनकर शंकर शिंदे वय-50वर्ष रा. महात्मा फुले नगर पंढरपुर हा अवैध सावकारी व्यवसाय करत असल्याने त्याच्या विरूद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *