ताज्याघडामोडी

नवजीवन चिल्ड्रेन्स हॉस्पिटलच्या वतीने मोफत बाल हृदयरोग निदान व उपचार शिबीर 

नवजीवन चिल्ड्रेन्स हॉस्पिटलच्या वतीने मोफत बाल हृदयरोग निदान व उपचार शिबीर 

बाल रुग्णांवर वेळीच निदान व उपचाराची गरज- डॉ.शीतल शहा 

कमलकांती मेडिकल फौंडेशन ट्रस्ट अँड रिसर्च सेंटर संचलित नवजीवन चिल्ड्रेन्स हॉस्पटिलच्या माध्यमातून व डॉ.शीतल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरीत दिनांक १ मार्च रोजी सकाळी ठीक १० ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात डॉ.संतोष जोशी(एम.बी.बी.एस.एम.डी.पीडियाट्रिक फिलोशिप इन कार्डियोलॉजि आर.जी.यु.एच.एस.इंटरव्हेशनल पीडियाट्रिक कॉर्डिऑलीजिस्ट),डॉ.विकास मस्के(एम.बी.बी.एस,डिप्लोमा इन कॉर्डिओल्जिस्ट केअर हॉस्पिटल,हैद्राबाद),डॉ.सुधीर आसबे,डॉ.सुनील पटवा हे बालरुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत.  

                   बाळ निळसर पडणे,बाळाचे वजन न वाढणे,जोरजोरात श्वास घेणे,दूध व्यवस्थित न पिणे व दूध पिताना कपाळावर घाम येणे,धाप लागणे,वारंवार निमोनिया होणे किंवा ASD,VSD,PDA यापैकी कोणताही लक्षणे आढळून येत असलेल्या बालकाची तपासणी या शिबिरात केली जाणार आहे.या शिबिरात लहान मुलांचा हृदयाचा टुडी इको(सोनोग्राफी),तपासणी मोफत करून बाळ हृद्यासंबंधित आजाराचे निदान करून योग्य उपचार करण्यात येणार आहेत.हृदयाचे जन्मजात असलेले छिद्र ओपनहार्ट शास्त्रकिया न करता डिव्हाईस तंत्राद्वारे (छत्री)बंद केले जातात.रक्त वाया जात नाही,चिरफर्ड व टाके याची आवश्य्कता नसते.  

        तरी रविवार दिनांक १ मार्च रोजी पंढरपूर येथील डॉ. शितल के.शहा हॉस्पिटल सरगम सिनेमा जवळ कॉलेज रोड पंढरपूर  येथे सकाळी १० ते ५ या वेळॆत उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *