ताज्याघडामोडी

खर्डी येथे जुगार अड्ड्यावर तालुका पोलिसांची कारवाई 

खर्डी येथे जुगार अड्ड्यावर तालुका पोलिसांची कारवाई 

लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त ४ व्यक्ती त्याब्यात तर तिघेजण पसार

पंढरपूर तालुकयातील खर्डी व परिसरात काही हॉटेल,धाबे तसेच अगदी मोकळ्या जागेतही जुगाराचे अड्डे चालविले जात असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यापासून होताना दिसून येत होती.शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी पंढरपूर तालुका पोलिसांनी अशाच एका जुगार खेळणाऱ्या टोळक्यावर कारवाई केली असून या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे तर ४ व्यक्तींनाही ताब्यात घेण्यात आले असून तिघेजण पसार झाले आहेत. 
       या बाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात पंजाब इंद्रजीत सुर्वे नेम.पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांनी सरकार तर्फे फिर्याद दाखल केली असून मौजे खर्डी ता.पंढरपूर येथील नामदेव रामचंद्र जाधव यांचे शेताचे कडेला काही लोक पत्याचे पानावर पैशाची पैज लावून अंदर बाहर नावाचा जुगार खेळत आहेत अशी खात्रीलायक माहीती मिळाली त्यानंतर खर्डी परिसरात शेताचे कडेला काही इसम गोलाकर बसून पत्ते हातात घेवुन जुगार खेळत असताना आढळून आले.पोलीस आल्याचा सुगावा लागताच सदर व्यक्ती या हातातील पत्ते मध्यभागी टाकुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पाठलाग करून 4 इसमांना ताब्यात घेण्यात आले तर 3 लोक पळून गेले या बाबत पोलिसांनी केलेल्या चौकशीत पुढील प्रमाणे नावे निष्पन्न झाली आहेत. 1) विनोद नामदेव जाधव वय 33 वर्ष रा.खर्डी ता.पंढरपूर 2) पोपट चिंतामणी हाके वय 36 वर्ष रा.खर्डी ता.पंढरपूर 3) दिनकर शिवाजी रोंगे वय 41 वर्ष रा.खर्डी ता.पंढरपूर 4) शरद अभिमान रोंगे वय 34 वर्ष रा.खर्डी ता.पंढरपूर अशी असल्याची सांगितली तसेच त्यांचेकडे पळून गेलेले इसमांचे नाव पत्ते विचारता त्यांनी आपली नावे 5) समाधान भारत वाकडे रा.खर्डी ता.पंढरपूर 6) संजय मारूती जाधव रा.खर्डी ता.पंढरपूर 7) नितीन सुभाष चंदनशिवे रा.खर्डी ता.पंढरपूर असे असल्याचे सांगीतले. पकडलेल्या इसमांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे कब्जात खालील वर्णनाचे जुगाराचे साहीत्य व रोख रक्कम मिळून आली त्यांचे वर्णन खालील प्रमाणे,1) 1660 /- रूपये रोख रक्कम मध्यभागी टाकलेली व 52 पत्याची पाने 2) 25,000/-रूपये त्यात 20000/- किंमतीची हिरो होन्डा कंपनीची मोटर सायकल MH45B6398 व 5,000 रूपये किंमतीचा एक सोनरी रंगाचा समसंग J2 कंपनीचा मोबार्इल आरोपी नं 1 याचे ताब्यात व अंगझडतीत मिळून आला किं.अंदाजे 3) 20,500/-रूपये त्यात 20000/- किंमतीची स्पेलंडर मोटर सायकल MH45AM0541 व 500 रूपये किंमतीचा एक काळया रंगाचा समसंग कंपनीचा मोबार्इल आरोपी नं 2 याचे ताब्यात व अंगझडतीत मिळून आला 4) 29,000/- रूपये त्यात 20,000/- किंमतीची हिरो फशन कंपनीची मोटर सायकल MH13BF8311 व 9000 रूपये किंमतीचा एक काळया रंगाचा समसंग कंपनीचा A20 मोबार्इल आरोपी नं 3 याचे ताब्यात व अंगझडतीत मिळून आला किं.अंदाजे 5) 20,000/-रूपये किंमतीची हिरो होंन्डा कंपनीची मोटर सायकल नं MH13D4210 ही आरोपी नं 5 याने जागीच सोडून गेला ती.किं.अंदाजे 96160/- येणे प्रमाणे वरील वर्णनाची रोख रक्कम व जुगाराचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *