ताज्याघडामोडी

मोडनिंब आणि माढा येथे लवकरच नव्याने एमआयडीसीची उभारणी 

मोडनिंब आणि माढा येथे लवकरच नव्याने एमआयडीसीची उभारणी 

ना.अदिती तटकरे यांच्यासमवेत आ.बबनराव शिंदे आ.संजय शिंदे यांची बैठक एमआयडीसीचे अनेक अधिकारीही बैठकीस उपस्थित 

ऊस उत्पादन आणि साखर कारखानदारी यामुळे माढा तालुक्याच्या अर्थकारणाला गती मिळाली असतानाच आता या तालुक्यात आणखी दोन एमआयडीसी क्षेत्राची उभारणी करण्यास मुंबई येथे झालेल्या बैठकीत तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे.ना. अदिती तटकरे यांच्या समवेत या बैठकीस आ. बबनराव शिंदे आणि आ.संजय शिंदे यांच्यासह महाराष्ट्र औधोगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, उपअभियंता सुनिल चि. कोलप, भूसंपादनचे महाव्यवस्थापक गोपीनाथ ठोंबरे आदी उपस्थित होते.    

   यावेळी आ. बबनराव शिंदे यांनी माढा तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी एमआयडीसी क्षेत्राची उभारणी करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून देत एमआयडीसी साठी आवश्यक असलेल्या नजीकचा रेल्वे मार्ग,रस्ते मार्ग व पाण्याची सुविधा उपलब्ध असल्याने माढा आणि मोडनिंब येथे एमआयडीसी उभारणे शक्य असल्याचे सांगितले.माढा तालुक्यातील टेम्भूर्णी येथे यापूर्वीच एमआयडीसीची उभारणी झाली असून आता आणखी दोन एमआयडीसी तालुक्यात उभारल्या जाणार असल्याने या परिसरातील आर्थिक विकासास चालना मिळणार आहे तर बेरोजगारांना रोजगाराची संधीही मिळणार आहे.

         आ.बबनराव शिंदे आणि आ. संजय शिंदे यांनी या भागातील अनेक वर्षाच्या मागणीला न्याय मिळवून देण्यासाठी आग्रही भूमिका घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *