पंढरपूर शहर पोलीस ठाण्याची हातभट्टी दारू व बेकायदा दारू विक्रीवर जोरदार कारवाई
उत्पादन शुल्क विभाग मात्र सुस्तच,राष्ट्रवादीच्या नेत्याने सुनावले खडे बोल
‘ड्राय डे’ दिवशी विक्री होणाऱ्या बाटल्यांचा बॅच नंबर तपासून पाहणार ?
राज्याचे उत्पादन शुल्क तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांच्या दौऱ्याच्या पार्शवभूमीवर उतपादन शुल्क विभाग अलर्टमोड्वर हातभट्टी दारू व बेकायदा देशी विदेशी दारू विक्री बाबत ठोस कारवाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच या कारवाईची जबाबदारी मात्र शहर पोलीस ठाण्यांने आपल्या खांद्यावर घेतली असल्याचे दिसून येते.तर याच वेळी उत्पादनशुल्क मंत्री ना. वळसे पाटील हे पंढरपुरात आलेले असताना उत्पादन शुल्क विभागाचे जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते याची खुमासदार चर्चा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये होत आहे.राष्ट्रवादी कॉग्रेसच्या एका जिल्हा पदाधिकाऱ्याने या बाबत संबंधित अधिकाऱ्याला खडे बोल सुनावल्याचे समजते.
गेल्या पाच दिवसात जुना सोलापूर रस्ता येथे हातभट्टी दारू विक्रीसाठी आणलेल्या ट्यूब जप्त करण्यात आल्या तर इसबावी,सांगोला रस्ता परिसरात हातभट्टी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.२६ जानेवारी रोजी मद्य विक्रीस बंदी आदेश असतानाही गोसावी वाईन शॉप शेजारी मोठ्या प्रमाणात विदेशी बनावटीच्या दारूची विक्री केली जात असल्याचे पोलीस कारवाईत उघड झाले असून या कारवाईत जप्त केलेल्या विदेशी दारूच्या बाटल्यांचा बॅच नंबर तपासून उत्पादन शुल्क विभागाकडून विना परमिट बेकायदा विक्री केल्याचा ”सुयोग्य” तपास करून कारवाई होणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.