ताज्याघडामोडी

सिंहगडच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात पालक मेळावा

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात शिक्षण घेत असलेल्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आढावा जाणून घेण्यासाठी गुरुवार दि. १६ जून २०२२ रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्यात विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी प्रास्ताविक करताना विभागातील शैक्षणिक माहिती सादर केली .तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध वेबिनार, कार्यशाळा आणि शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांचीं प्लेसमेंट याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सत्रामध्ये सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी विविध कल्पकतेला वाव देणाऱ्या वेबिनार व कार्यशाळेत मध्ये सहभाग घेण्यास पालकांनी आपल्या पाल्याला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले. विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास संबंधित प्राध्यापकांशी संपर्क साधावा असे ही आवाहन त्यांनी पालक मेळाव्यात बोलताना केले.
दरम्यान कॉलेजचे प्राचार्य डॉ .के .जे.करांडे बोलताना म्हणाले की,मुलांनी घवघवीत यश मिळवण्यासाठी अद्ययावत प्रणाली कायम आत्मसात केली पाहिजे तसेच भविष्यात कंपनीच्या गरजा ओळखून कायम अद्ययावत राहिले पाहिजे.असे यश मिळवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे .
या पालक मेळाव्यात सहभागी झालेल्या पालकांनी होस्टेल, शिष्यवृत्ती, ईबीसी, प्रकल्प सादरीकरण, परिक्षेचे स्वरूप, प्लेसमेंट या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी समर्पक उत्तरे दिली. या मेळाव्यात पालक प्रतिनिधी म्हणून श्री.धनंजय भोंग यांनी आपले मनोगत व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली .या मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा.गणेश बिराजदार व आभार प्रदर्शन प्रा. वैष्णवी उत्पात यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *