ताज्याघडामोडी

पंढरीतील बेकर्स गॅलरीसह दोन दूध संकलन केंद्रावर अन्न भेसळ विभागाची प्रतिबंधक कारवाई 

पंढरीतील बेकर्स गॅलरीसह दोन दूध संकलन केंद्रावर अन्न भेसळ विभागाची प्रतिबंधक कारवाई 

बेकर्स गॅलरीस आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश 

पंढरीतील प्रसिद्ध बेकर्स गॅलरी या खाद्य पदार्थ विक्रीच्या आस्थापनावर अन्न विभागाने कारवाई केली असून गुरुवार दिनांक 19 डिसेंबर रोजी स्टेशन रोड येथे  अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या अनुषंगे तपासनी केली असता  सदर आस्थपना विना परवाना आढळून आली. तसेच पेढीत उत्पादित करण्यात येणाऱ्या बेकारी पदार्थासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल मुदातबाह्य म्हणजेच एक्सपायर असल्याचे तापसणीवेळी आढळून आले. त्यामुळे सदर पेढीस तत्काळ परवाना घेई पर्यंत तसेच तपासनी अहवलाच्या अनुषंगे सुधारणा करेपर्यंत व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर पेढीस अन्न पदार्थ / कच्चा माल पुरवठा करणार्या पेढ्यांवर कलम 14 अंतर्गत कारवाई प्रस्तावित केली जाईल अशी माहिती सह.आयुक्त अन्न विभाग प्रदीप राऊत यांनी दिली आहे.     सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी  श्री. प्रशांत कुचेकर व सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. मंगेश लवटे यांनी सहाय्यक आयुक्त श्री. प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा, अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलण्यात येणार आहेत असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त श्री. सुरेश देशमुख यांनी केले आहे. 

   त्याच बरोबर बुधवारी पंढरपूर तालुक्यातील दोन दूध संकलन केंद्रावरही कारवाई करण्यात आली असून इंदापूर डेअरी अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा लि (सोनाई डेअरी) ,मु.पो. सुस्ते, ता. पंढरपूर, जि. सोलापुर या पेढीची अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या अनुषंगे तपासनी केली. तपासनीवेळी सदर आस्थापनाने अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील परवाना अट क्र 4 चे उल्लंघन केलेले म्हणजेच सदर आस्थापनेत अहर्ता प्राप्त व्यक्तीची नेमणूक केली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर पेढीस तत्काळ परवाना अट क्र 4 ची पूर्तता करेपर्यंत तसेच तपासनी अहवलाच्या अनुषंगे सुधारणा करेपर्यंत व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मे. रियल डेअरी (बारामती) यांचे संकलन केंद्र तुंगत, ता. पंढरपूर, जि. सोलापूर या पेढीची पेढीची अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या अनुषंगे तपासनी केली. तपासनीवेळी सदर आस्थपना विना परवाना आढळून आली. त्यामुळे सदर पेढीस तत्काळ परवाना घेई पर्यंत तसेच तपासनी अहवलाच्या अनुषंगे सुधारणा करेपर्यंत व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *