पंढरपूर शहराच्या बाह्य वळण मार्गावरील क्रांतीसिह नाना पाटील चौक. प्रबोधनकार ठाकरे चौक. अहिल्या चौक . कासेगाव फाटा. पंत चौक आदी ठिकाणी गतिरोधक व सुचना फलक नसल्याने बाह्य वळण मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचे वारंवार अपघात घडत आहेत कित्येक माणसांना आज पर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे दिवसेन दिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. या बाह्य वळण मार्गावरील चौका चौकात सुचना फलक व स्पीडब्रेकर आसणे अतिशय गरजेचे आहे…
पंढरपूर शहरातील अंतर्गत रस्त्या वरून बाह्य वळण मार्गाला जोडणाऱ्या प्रत्येक चौकात गतिरोधक व सुचना फलक लावल्यास याचा अपघातांवर मोठा परिणाम होऊन अनेक जीव वाचतील तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने याची गंभीर दखल घेऊन त्वरित स्पीडब्रेकर व सुचना फलक उभे करावेत अन्यथा बांधकाम प्रशासनाचे लक्ष वेधण्या साठी बोंबाबोंब आंदोलन छेडण्यात येईल व होणार्या परिणामास बांधकाम प्रशासन जबाबदार राहील. आसा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख बंडू घोडके यांनी संपर्कप्रमुख अनिलजी कोकीळसाहेब व जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या आदेशाने लेखी निवेदना द्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला आज दिला आहे
या वेळी जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे इंद्रजित गोरे संजय घोडके नागेश रितुंड अर्जुन भोसले उत्तम कराळे संगिताताई पवार अनिताताई आसबे संजय पवार कल्याण कदम बाबासाहेब पाटील महमंद पठाण जालिंदर शिंदे अदित्य घोडके आकाश माने नामदेव चव्हाण विजय बागल नागेश जाधव महावीर हाके बळीराम देवकते अजित पवार हर्षवर्धन जाधव
आदी शिवसैनिक मोठ्या संख्येन हजर होते..
