ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

बुरूड समाजाचे आराध्यदैवत श्री.संत केतय्या स्वामी यांची जयंती आज उत्साहात साजरी

        पंढरपूर –  बुरूड समाजाचे आराध्यदैवत महातपस्वी श्री.संत केतय्या स्वामी यांची जयंती आज खादी ग्रामोद्योग परिसरात आमदार प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते उत्साहात पार पडली.

        सदर जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार मा.प्रशांतराव परिचारक तर प्रमुख पाहुणे पंढरपूर म्हणून नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष मा.श्री.अनिल अभंगराव सर, अधिकारी श्री.सुनिल वाळूजकर, समाजसेवक धर्मराज घोडके आदी मान्यवरांचे उपस्थितीत होते. याप्रसंगी लक्ष्मण पापरकर, पक्षनेते गुरूदास अभ्यंकर, नगरसेवक राजू सर्वगोड, इब्राहीम बोहरी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून श्री संत केतय्या स्वामींना अभिवादन केले.

        यावेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक म्हणाले, बुरूड समाजाने युवक व महिलांनी पुढे येवून बांबू कला प्रशिक्षण व शिबीरांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करावे, यासाठी लागणारे सर्वोतोपरी सहकार्य माझे वतीने केले जाईल. तसेच समाजातील गरजू कुटूंबियांना घरकुल अंतर्गत घर व समाजासाठी समाज मंदिर उभे करण्यासाठी सहकार्य करणे तयारी त्यांनी दर्शविली. जयंतीचे औचित्य साधून बुरूड समाजाचे वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील अनेक बांधवान तसेच महिलांनीही रक्तदानात उस्फुर्दपणे भाग घेतला. तसेच यावेळी महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले होते.  

        बुरूड समाजाचे वतीने यावेळी माजी आमदार स्व.सुधाकरपंत परिचारक, आमदार स्व.भारतनाना भालके, भागवताचार्य स्व.वा.ना.उत्पात, स्व.रामदास महाराज कैकाडी, स्व.राजुबापू पाटील यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करणेत आली.

        याप्रंसगी पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक मनोज सुरवसे, नामदेव साळुंखे, बाळासोा साळुंखे, किरण सुरवसे, विष्णु सुरवसे, मोहन सुरवसे, कुमार सुरवसे, दिलीप सुरवसे, राजाभाऊ सुर्यवंशी, वसंत सुरवसे, प्रदिप साळुंखे, लखन साळुंखे, मयुर साळुंखे, मंगेश सुरवसे, विजय सुरवसे, संभाजी कुकडे, सुरज सुरवसे आदी समाज बंधुभगिनी मोठ्या संखेने उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *