सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती वै. राजूबापू पाटील यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. माजी उपसरपंच आणि श्री. दत्त दूध संकलन केंद्राचे चेअरमन सिध्देश्वर पवार यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात लोकनेते राजूबापू पाटील यांच्या कार्याची महती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. या कार्यक्रमासाठी सरपंच संजय देवळे, ग्रामपंचायत सदस्य अशोक पवार, पांडुरंग पवार, विकास पवार, प्रशांत जमदाडे, माजी सरपंच दिलीप पवार, विष्णू गवळी, माजी उपसरपंच सुरेश पवार, समाजभूषण बंडू पवार, पत्रकार अण्णासाहेब पवार, सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक अर्जुन पवार, प्रशांत पवार, बाळासाहेब साळुंखे, पैलवान सत्यवान जाधव, सिध्देश्वर गोविंद पवार, राजू जमदाडे, मारुती पवार, मारुती बनसोडे, मुख्याध्यापक श्री. बिराजदार, सहशिक्षक श्री. भाकरे यांच्यासह विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
