ताज्याघडामोडी

महिबूब शेख यांची अजितदादांवर टीका करण्याची पात्रता नाही प्रदेशाध्यक्ष पद वाचविण्यासाठीच अजितदादांवर टीकेचा केविलवाणा प्रयत्न-श्रीकांत शिंदे पंढरपूर-

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात 2 गट पडल्यानंतर लोकसभा निवडणूक झाली आता विधानसभा निवडणूकीचे वेध सर्वांना लागलेले आहे. असे असताना शरदचंद्र पवार यांच्या गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख यांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यावर टीका केलेली आहे. ज्याने काकाचे ऐकले नाही तो पुतण्या लोकसभेत गेला असे म्हणत गुलाबी कलरवरून देखील अजितदादांवर टीका केली असून विधानसभेला अजितदादांची अवस्था तेलंगणाच्या केसीआर यांच्याप्रमाणे होईल अशी टीका केेलेली आहे या टीकेला आता अजितदादांचे समर्थक व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिलेले आहे.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देवून आपण शिवसूराज्य यात्रा काढत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचावे उगाच गर्दी समोर दिसते अन्‌ स्वतः चे महत्व वाढवण्यासाठी हे समजायला.मार्ग नाही. अजितदादांवर टीका करण्याएवढी महिबूब शेख यांची पात्रता नाही त्यांची राजकीय उंचीदेखील तेवढी नाही. राष्ट्रवादीत प्रत्येक 3 वर्षाला नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते मात्र महिबूब शेख हे युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून गेल्या 8 वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष पदाला चिकटून बसलेले आहेत. अनेक सक्षम युवक नेते असताना देखील त्यांना पदावर येवू दिले नाही. त्यांना पद सोडू वाटत नाही त्यामुळे वरिष्ठांना खूष करण्यासाठी दुसऱ्या नेत्याचे ऐकून अजितदादांवर टीका करण्याचे काम महिबूब शेख यांनी केले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही नेते हे स्वत: पुढे येवून अजितदादांवर टीका करण्याचे धाडस नसल्याने महिबूब शेख यांच्यासारख्या स्वत:च्या बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात ताकद नसलेल्या नेत्याला पुढे करून टीका करत आहेत.
लोकसभेला महायुतीकडून भाजप नेत्या पंकजा मुंडे विरूध्द महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यात सामना झाला त्यावेळी महिबूब शेख आपण आष्टी विधानसभेतील ज्या पिंपळनेर गावात राहता त्या ठिकाणी एकाही बुथवर 50 मते देखील मिळवून देता आली नाही त्यावरूनच गावात किती पात्रता आहे व त्यांना लोक किती किंमत देतात हे दिसून येते. केवळ गोड गोड बोलून वरिष्ठांना खुश करण्यापेक्षा दुसरे काहीही काम महिबूब शेख यांना येत नाही. ज्या मतदारसंघात आपण राहता एक राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे की किमान आपल्या मतदारसंघात तरी आपल्या तुतारीच्या उमेदवाराला मताधिक्य देणे हे अपेक्षित होतं पण आपल्या बुथमध्ये सुद्धा खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांना लीड देऊ शकला नाही खऱ्या अर्थाने त्याच ठिकाणी आपली नैतिक जबाबदारी म्हणून आपण प्रदेशाध्यक्ष पदाचा मोठ्या मनाने राजीनामा द्यायला पाहिजे होता पण तेवढी ही नैतिकता आपल्याजवळ नाही त्यामुळे आपण विकासपुरुष असलेल्या आदरणीय अजितदादांवर बोलताना जरा विचार करून बोलावे कारण आपल्या नेत्यांचे शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतात हे न समजण्याइतके राजकारणात कोणी लहान राहिले नाही.
अजितदादांची के चंद्रशेखर राव यांच्यासारखी परिस्थिती होईल यावर भविष्यवाणी करण्यापेक्षा प्रदेशाध्यक्ष पदावरून एकदा पायउतार झाले नंतर आपण आपला राजकीय प्रवास काय असेल याचा विचार अन्‌ अभ्यास केला तर बरे होईल. कारण अजितदादा हे अजित दादा अन्‌ राजकीय पटलावर त्यांचे स्थान त्यांनी निश्चित केले आहे काका सोबत असतानाही काका शिवाय ही त्यामुळे तुम्ही अजित दादांवर बोलण्याईतके अजून एवढे मुरब्बी राजकारणी झाला नाहीत
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस मध्ये जेपी गट व अजित दादा गट ही सुरुवात आपण केली अजितदादा गटाच्या कार्यकर्त्याला कायम दुय्यम स्थान जयंत पाटील साहेब यांना मानणाऱ्या कार्यकर्त्याला अग्रस्थानी हे असले राजकारण आपण सुरू केले असे अनेक गोष्टी आहेत म्हणून झाकली मूठ सव्वा लाखाची ती झाकलेली राहू द्या असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी खडेबोल सुनावले आहेत.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी एकसंघ असताना महाबळेश्वर येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शिबिरामध्ये आदरणीय पवार साहेबांनी एक सल्ला दिला होता राजकारणात कोणी खुर्ची देत नसते ती खुर्ची हिसकावून घ्यावी लागते पण आदरणीय पवार साहेब अजित दादांना खुर्ची द्यायला तयार होते पण साहेबांच्या जवळील काही ठराविक नेत्यांचा त्या गोष्टीला विरोध होता म्हणूनच अजितदादांनी पवार साहेबांच्या शब्दाचा विचार करून स्वतःहून आपली जागा आणि खुर्ची तयार करून घेतली अजितदादांवर टीका करून आपण जरूर काही नेत्यांच्या नजरेत आपली प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न करत असाल पण शेवटी काका आणि पुतण्या यांचे राजकारण तुम्हाला आत्ताच कळणार नाही योग्य वेळी योग्य निशाणा साधण्याची किमया अजितदादांमध्ये आहे एकदा आपण प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर आपल्याला महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काय स्थान आहे हे समजून येईल,अशी टिका श्रीकांत शिंदे यांनी महिबूब शेख यांच्यावर केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *