ताज्याघडामोडी

Google Payच्या चुकीने युजर्स मालामाल; काहींच्या खात्यात १०००, तर काहींना मिळाले ८० हजार

डिजीटल पेमेंटचा ट्रेंड सतत वाढतो आहे. वाढत्या डिजीटल ट्रान्झेक्शनसह अनेकदा फ्रॉडच्या केसेसही समोर येत आहेत. डिजीटल ट्रान्झेक्शन करताना युजरच्या एखाद्या लहानशा चूकीमुळे मोठं नुकसान होऊ शकतं. कधी युजरकडून चुकून एखाद्या दुसऱ्याच चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. असंच एक प्रकरण गुगलपे अकाउंटद्वारे घडल्याचं समोर आलं आहे.

गुगलपेमध्ये आलेल्या एका एररनंतर अचानक युजर्सच्या खात्यात कॅशबॅश येऊ लागले. अनेक लोकांना कॅशबॅकचे मेसेज येऊ लागेल. कोणाला १००० रुपये तर कोणाला चक्क ८० हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक आले. अचानक खात्यात पैसे आल्याने कोणीही खूश होईल आणि असाच प्रकार या कॅशबॅश आलेल्या युजर्ससोबत घडला, पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही.

भरमसाठ कॅशबॅक देत गुगलपेने युजर्सला आनंदाचा झटका दिला. ज्या युजर्सला कॅशबॅक मिळाल्याचा मेसेज आणि आणि अकाउंटमध्ये पैसेही आले, त्याच युजर्सला गुगलपेने नंतर लगेच एक मेसेज पाठवून पैसे परतही घेतले. गुगलपेमध्ये आलेल्या टेक्निकल ग्लिचमुळे युजर्सला कॅशबॅक मिळत होता, पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कंपनीचा बग, टेक्निकल एरर जसा दुरुस्त झाला, तसं लगेच गुगलपेने अॅपद्वारे पाठवलेले पैसे परत घेतले. कंपनीने लोकांना असा मेसेज पाठवला, की अॅपमध्ये आलेल्या टेक्निकल एररमुळे रिलीज झालेले अमाउंट परत घेत आहोत.

लोकांनी याबाबत आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्विटरवर लोक आपल्या कॅशबॅक अमाउंचचा स्क्रिनशॉट काढून शेअर करत आहेत. काही लोकांनी गुगलपेवरुन अचानक आलेले पैसे खर्च केले. तर काहींनी ते पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले, त्यांच्याकडे कंपनीचा पैस अडकला आहे. कंपनीने त्यांच्याकडून पैसे परत घेतले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *