Uncategorized

जागितक पर्यावरण दिनानिमित्त प्रणव परिचारक यांच्या हस्ते विविध ठिकाणी वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत युवक नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते राहुल परचंडे मित्र परिवार आणि विनायक संगीतराव मित्र परिवार यांच्या माध्यमातून पंढरपूर शहरामध्ये अंबाबाई पटांगण, जुनी पेठ व इतर ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
                 यावेळी बोलताना प्रणव परिचारक म्हणाले कि,वृक्ष हे आपल्याला ऑक्सिजन देतात,कोरोनाच्या काळात आपल्याला ऑक्सिजनचे महत्व कळले आहे.प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात दरवर्षी एक झाड लावले आणि त्याचे संगोपन केले तर त्यातून जे समाधान प्राप्त होणार आहे ते नक्कीच अनमोल असणार आहे.आपण निसर्गाकडून फुकटात बरेच काही घेतो पण निसर्गाला परत करण्याबाबत मात्र आपण गाफील राहतो.तेव्हा यापुढे प्रत्येकाने प्रतिवर्षी एक झाड लावण्याचा संकल्प सोडावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
      यावेळी लावलेल्या सर्व वृक्षांची देखभाल, जबाबदारी यंगस्टर क्रिकेट क्लब, जय बजरंग क्रिकेट क्लब,जय मल्हार क्रिकेट क्लब यांनी घेतली आहे.यावेळी विजय अभंगराव,अशोक मेटकरी, बिरु मेटकरी, तात्यासाहेब सिताप, माऊली अधटराव, आणि तरुण सहकारी मित्र उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *