ताज्याघडामोडी

स्व.बाळासाहेब ठाकरे संशोधन मुसदा समितीच्या सदस्यपदी संभाजी शिंदे यांची निवड

अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन समितीचा निर्णय

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे हिंदू ह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे संशोधन केंद्र सुरु करण्यात येणार असून या संशोधन केंद्राच्या मसुदा समितीच्या सदस्यपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणूस आणि कामगार यांच्या हक्कासाठी सुरु केलेला लढा,त्यातून उदयास आलेला शिवसेना हा पक्ष आणि या माध्यमातून राज्याच्या राजकरणावर,समाजकारणावर पडलेला प्रभाव हा कायम नव्या पिढीसाठी जिज्ञासेचा,अभ्यासाचा विषय राहिला आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे स्व.बाळासाहेब ठाकरे संशोधन केंद्र सुरु केले जाणार आहे.
  यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या २२ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे संशोधन केंद्राच्या मसुदा समितीबाबत निर्णय घेत या समीतीच्या अध्यक्ष व सदस्यांची नावे निश्चित करण्यात आली.या नुसार या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी सचिन मारुती गायकवाड(सोलापूर) ,ऍड.उषा नंदकुमार पवार (बार्शी),संजय नामदेव साळूंखे (सोलापूर),अस्मिता गायकवाड (सोलापूर ) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पंढरपुर विभाग प्रमुख संभाजी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.मागील ४० वर्षांपासून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार निष्ठेने जपत आलेल्या संभाजी शिंदे यांची सदस्यपदी निवड झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *