ताज्याघडामोडी

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्ते व पूल मजबुतीकरणासाठी ८९ कोटी रुपये निधी मंजूर – आमदार आवताडे

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्ते व पुलाचे मजबुती व सुधारणा करणे कामांसाठी राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण व पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्ते, पुल व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयास ८९ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. 

पंढरपूर व मंगळवेढा मतदारसंघातील दळणवळणच्या दृष्टिनी रस्ते, पूल गेल्या अनेक दिवसांपासून मजबूत व दुरुस्त करणे अतिशय गरजेचे होते. सदर रस्त्याने दररोज दळणवळण करत असणाऱ्या नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रवास सुखकर करण्यासाठी हे रस्ते सुधारित करण्यात यावेत यासाठी आमदार आवताडे यांनी संबंधित विभागाकडे आर्थिक तरतूद करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. आमदार आवताडे यांनी केलेल्या या मागणीची राज्य पातळीवर दाखल घेऊन हिवाळी अधिवेशनामध्ये निधी मंजूर झाल्याने या रस्त्यांचा कायापालट होण्यास खूप मोठी मदत होणार आहे.

पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघातील मंजूर असलेले कामे

गुंजेगाव आंधळगाव पाटखळ नंदेश्वर भोसे हुन्नुर रेवेवाडी रस्ता रा.मा. 391 कि.मी. 76/00 ते 78/500 ( भाग – भोसे ते हुन्नुर ) मध्ये सुधारणा करणे.

सि‌द्धेवाडी ते चिचुंबे रस्ता ग्रामा 43 किमी 0/000 ते 2/500, मध्ये सुधारणा करणे.

बोराळे, अरळी ते दसुर रस्ता प्रजिमा – 62 कि.मी. 00/00 ते 4/00 मध्ये सुधारणा करणे.

शिरबावी उंबरगाव टाकळी पंढरपुर रस्ता रामा 388 किमी 17/500 ते 19/000 ( भाग – उंबरगाव ते बोहाळी ) व 21/500 ते 24/500 ( भाग – बोहाळी ते टाकळी ) मध्ये सुधारणा करणे.

गुंजेगाव आंधळगाव पारखळ नंदेश्वर भोसे हुन्नूर रेवेवाडी रस्ता रा.मा. 391 कि.मी. 78/500 ते 80/180 ( भाग – हुन्नूर ते जिल्हा हद्द ) मध्ये सुधारणा करणे.

कासेगाव ते तावशी रस्ता ग्रामा 46 किमी 0/000 ते 5:00 मध्ये सुधारणा करणे.

लक्ष्मी दहीवडी आधळगाव पाटखळ हाजापुर भाळवणी तळसंगी ते रा.म. 561 अ ला जोडणारा रस्ता प्रजिमा – 74 कि.मी. 10/100 ते 12/600 ( पेट्रोलपंप ते आधळगाव (व कि. मी. 19/00 ते 20:00 ( पाटखळ शाळेपासून पुढे ) मध्ये सुधारणा करणे.

कासेगाव ते तपकिरी शेटफळ रस्ता ग्रामा 67 किमी 0/000 ते 7/00 मध्ये सुधारणा करणे.

धर्मगाव ढवळस मल्लेवाडी घरनिकी मारापूर गुजेगाव लक्ष्मी दहीवडी रस्ता प्रजिमा – 76 कि.मी. 8/200 ते 13/00 (घरनिकी ते मारापूर) मध्ये सुधारणा करणे.

उंबरगाव ते खर्डी रस्ता ग्रामा 54 किमी 0/000 ते 4/500 मध्ये सुधारणा करणे.

गोपाळपुर मुंढेवाडी चळे आबे सरकोली प्रजिमा 112 किमी 6/200 ते 7/500 ( भाग – मुंढेवाडी ते चळे ) मध्ये सुधारणा करणे.

रा.म. 561 अ ते सोड्डी चडचण रस्ता प्रजिना – 158 कि.मी. 00/00 ते 4/600 मध्ये सुधारणा करणे.

टाकळी कासेगाव अनवली रांझणी रस्ता प्रजिमा 83 किमी 11/500 ते 12/500 व 14/000 ते 15/000 ( भाग – अनवली ते रांझणी ) मध्ये सुधारणा करणे. 

रा.म. 166 ते कचरेवाडी रस्ता प्रजिमा 159 कि.मी. 2/700 ते 3/200 ( कचरेवाडी गावाजवळील ) मध्ये सुधारणा करणे. 

खेड भाळवणी बाजीराव विहीर गादेगाव कोर्टी बोहाळी खर्डी तनाळी रस्ता रामा 391 किमी 25/200 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे.

बोराळे सिध्दापूर तालुका हद्द रस्ता प्रजिमा – 63 कि.मी. 6/00 ते 9/500 मध्ये सुधारणा करणे.

वाखरी ते वडाचीवाडी ग्रामा 92 रस्ता किमी 0/000 ते 3000 मध्ये सुधारणा करणे.

लक्ष्मी दहीवडी म्हसोबा देवस्थान ते तालुका हद्दीपर्यंत रस्ता ग्रामा – 313 कि.मी. 00/00 ते 1/500 मध्ये सुधारणा करणे.

कौठाळी ते जोडरस्ता (ग्रा. मा. 47) ग्रामा 51 रस्ता किमी 0/000 ते 4/500 मध्ये सुधारणा करणे.

आवताडेवाडी ते नंदेश्वर रस्ता ग्रामा 65 कि.मी. 00/00 ते 7/500 मध्ये सुधारणा करणे.

उपरी ते गादेगाव रस्ता ग्रामा 60 किमी 3/000 ते 5/000 मध्ये सुधारणा करणे.

चिक्कलगी ते मारोळी रस्ता ग्रामा 67 कि.मी. 00/00 ते 7/00 मध्ये सुधारणा करणे.

प्रजिमा – 76 लक्ष्मी दहीवडी गुंजेगाव तनाळी कासेगाव ते पंढरपूर रस्ता प्रजिमा- 168 कि.मी.43/00 ते 45/200 (भाग- पंढरपूर ते कासेगाव) मध्ये सुधारणा करणे, 

जुनोनी ते नंदेश्वर रस्ता यामा 62 कि. मी. 00/00 ते 5/00 मध्ये सुधारणा करणे.

लवंगी ते उमदी रस्ता ग्रामा 97 कि.मी. 00/00 ते 200 मध्ये सुधारणा करणे.

फटेवाडी ते रा.म. 561 अ ला जोडणारा रस्ता ग्रा.मा. 48 कि.मी. 00/00 ते 1/200 मध्ये सुधारणा करणे.

लैंडवेचिंचाळे ते आंधळगाव रस्ता ग्रामा 13 कि.मी. 3/00 ते 4/00 व कि.मी. 5/00 ते 600 मध्ये सुधारणा करणे. 

कचरेवाडी ते गणेशवाडी रस्ता ग्रामा – 246 कि.मी. 00/00 ते 1/00 मध्ये सुधारणा करणे.

कागष्ट ते येड्राव रस्ता ग्रामा – 31 कि.मी. 3/00 ते 5/00 मध्ये सुधारणा करणे.

भोसे ते आवताडेवाडी ते तालुका हद्द रस्ता ग्रामा – 267 कि.मी. 00/00 ते 3/00 मध्ये सुधारणा करणे.

नंदेश्वर जातिहाळ भाळवणी मरवडे ते डोणज रस्ता इजिमा – 85 कि.मी. 18/00 ते 23/00 ( मरवडे ते डोणज ) मध्ये सुधारणा करणे.

हुलजंती ते खवे ग्रा.मा. 106 ( हुलजंती ते माळेवाडी ) कि.मी. 00/00 ते 4/00 मध्ये सुधारणा करणे.

हिवरगाव ते प्रजिमा – 73 ला जोडणारा रस्ता ग्रामा – 70 कि.मी. 00/00 ते 4/00 मध्ये सुधारणा करणे.

तसेच नाबार्ड कडून बावची गावा शेजारी असणाऱ्या ओढ्यावर पूल उभारणीसाठी यापूर्वी ३ कोटी ५० लाख निधी मंजूर केलेला होता. परंतु सदरील निधीमध्ये अपुरे काम होत असल्याने वाढीव निधी ५ कोटी २३ लाख मंजूर झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *