ताज्याघडामोडी

25 जिल्ह्यातले निर्बंध हटवले, नवी नियमावली जारी, पहा काय सुरु, काय बंद?

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका अद्याप कायम असल्याचं सांगण्यात येत आहे. अशावेळी राज्य सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारने कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 25 जिल्ह्यात मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. तर 11 जिल्ह्यात मात्र लेवल 3 चे निर्बंध कायम असणार आहेत. हे 25 जिल्हे कोणते आहेत, त्यात कोणत्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आलीय? तर कोणत्या 11 जिल्ह्यांमध्ये लेवल 3 चे निर्बंध कायम राहणार आहेत हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

या नव्या नियमानुसार 25 जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवारी 8 वाजेपर्यंत सर्व दुकानं सुरु ठेवता येतील.तर शनिवारी दुपारी 3 पर्यंत दुकानं सुरु ठेवण्यास मुभा असेल. मात्र रविवारी पूर्णत: बंद असेल. सरकारच्या या नियमावलीमध्ये मुंबई लोकल रेल्वेचा कुठेही उल्लेख नाही.

नवी नियमावली कशी आहे?

1. सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी. शनिवारी मात्र मात्र दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार. रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहतील.

2. सर्व ग्राऊंड, गार्डन्स हे व्यायामासाठी खुली ठेवण्यास मंजुरी

3. सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी. फक्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

4. जी कार्यालयं वर्क फ्रॉम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी.

5. कृषी, औद्योगीक, नागरी, दळणवळणाची कामं पूर्ण क्षमतेनं करण्यास मंजूरी

6. जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येतील. वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी

7. जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे शनिवारी दुपारी 3 पर्यंत सुरु राहतील तर रविवारी पूर्णपणे बंद

8. सर्व प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार

9. शाळा आणि महाविद्यालयांबाबत संबंधित विभागाच्या आदेशानुसार नियम लागू राहणार

10. सर्व रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेनं दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार. हा नियम सोमवार ते शुक्रवार लागू असेल. यावेळी कोरोना नियमांचं पालन बंधनकारक असेल. पार्सल आणि होम डिलिव्हरी सेवा सुरु राहणार.

11. रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार.

12. वाढदिवस, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक, निवडणूक प्रचार, रॅली, मोर्चा, आंदोलनावर बंदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *